शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

६ हजार १७४ घरकूल अपूर्ण

By admin | Published: October 19, 2015 2:00 AM

इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात बाराही तालुक्यात उद्दिष्टांइतकेच ७ हजार ७९४ घरकूल मंजूर करण्यात आले.

काम ढेपाळले : १६३ घरकुल बांधकामाला प्रारंभच नाहीगडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात बाराही तालुक्यात उद्दिष्टांइतकेच ७ हजार ७९४ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ १ हजार ४५७ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून तब्बल ६ हजार १७४ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत. विशेष म्हणजे १६३ घरकुलांच्या बांधकामाला अद्यापही प्रारंभच झाला नसल्याची धक्कादायक माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. एकूणच जिल्ह्यात घरकूल बांधणीचे काम ढेपाळले असल्याचे दिसून येते.आरमोरी तालुक्यात ४५४ मंजूर घरकुलांपैकी १९२ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून २६२ घरकूल अपूर्ण आहेत. चामोर्शी तालुक्यात ६३६ घरकुलांपैकी केवळ ५२ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून ५५१ घरकूल अपूर्ण आहेत. धानोरा तालुक्यात ९७४ घरकुलांपैकी १४९ घरकूल पूर्ण करण्यात आले असून ८२२ घरकूल अपूर्ण आहेत. एटापल्ली तालुक्यात ५३६ घरकुलांपैकी ३६ घरकूल पूर्ण झाले असून ५०० घरकूल अपूर्ण आहेत. गडचिरोली तालुक्यात ४५२ घरकुलांपैकी २७१ घरकूल पूर्ण झाले असून १८१ घरकूल अपूर्ण आहेत. कोरची तालुक्यात ६९४ घरकुलांपैकी १०८ घरकूल पूर्ण करण्यात आले असून ५८६ घरकूल अपूर्ण आहेत. कुरखेडा तालुक्यात ९०८ घरकुलांपैकी ३५२ घरकूल पूर्ण झाले असून ५५६ घरकूल अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात ३१९ घरकुलांपैकी १०१ घरकूल पूर्ण झाले असून २१८ घरकूल अपूर्ण आहेत. देसाईगंज तालुक्यात ९२ घरकुलांपैकी ५६ घरकूल पूर्ण झाले असून ३६ घरकूल अपूर्ण आहेत तर सिरोंचा तालुक्यात एकूण ७०० घरकुलांपैकी ११७ घरकूल पूर्ण झाले असून तब्बल ५७८ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत. पहिल्या हफ्त्याचे अनुदान देऊनही लाभार्थी घरकूल बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यात घरकूल बांधकामाची गती प्रचंड मंदावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)