शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

६१५ नक्षल्यांनी सोडली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:09 AM

लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आतापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपोलिसांसमोर केले आत्मसमर्पण : दलम सदस्यासह वरिष्ठ कमांडरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आतापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.आदिवासी बांधवाच्या हितासाठी लढण्याची भाषा करून स्वत: सुखी संपन्न असलेले नक्षली नेते राज्यातीलआदिवासी भागातील तरूण-तरूणींना, तसेच लहान मुलांना खोट्या भूलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढतात. या तरूण-तरूणींना काही वर्षातच आपण भरकटले गेलो असल्याची जाणीव होते. मात्र बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला वरिष्ठ नक्षल्यांच्या आदेशाने जिवे मारण्यात येईल, अशी भीती सहकारी नक्षलवाद्यांकडून दाखविली जाते. त्यामुळे हे तरूण मनाविरूध्द नक्षल्यांना साथ देत असतात. नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात यावा, या उद्देशाने राज्य शासनाने २९ आॅगस्ट २००५ पासून आत्मसमर्पण योजना सुरु केली. सन २००५ ते जून २०१८ या कालावधीत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ६१५ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यात केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ५९६, तर गोंदिया जिल्ह्यातील १७ व चंद्रपूर जिल्ह्यातील २ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यामध्ये १ दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य, ६ डिव्हीजनल कमेटी सदस्य, २५ कमांडर, २९ उपकमांडर, ३१५ दलम सदस्य, ११५ क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२४ संगम सदस्य यांचा समावेश आहे.पहिल्या टप्प्यात एकूण ७ दलम सदस्य, ५ क्षेत्रीय/ ग्रामरक्षक दल सदस्य, ६५ संगम सदस्य अशा एकूण ७७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात गडचिरोलीतील ६७ व गोंदिया येथील १० नक्षलवाद्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली येथील २ उपकमांडर, १० दलम सदस्य, १ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ४ संगम सदस्य अशा एकूण १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तिसऱ्या टप्प्यात २ उपकमांडर, २७ दलम सदस्य, १५ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, ३१ संगम सदस्य अशा एकूण ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात गोंदियातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे. चवथ्या टप्प्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, २७ दलम सदस्य, ७६ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य, २४ संगम सदस्य अशा एकूण १३३ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला.पाचव्या टप्प्यात १ दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य रैना ऊर्फ रघू ऊर्फ जालमलाय लालुसाय सडमेक याने आत्मसमर्पण केल्यामुळे पोलिसांना फार मोठे यश प्राप्त झाले. तसेच १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ३ दलम कमांडर, २ उपकमांडर, २३ दलम सदस्य अशा ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात गडचिरोलीतील २८ व गोंदिया येथील २ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सहाव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, १२ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण १५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.सातव्या टप्प्यात ३ कमांडर, ३ उपकमांडर, १५ दलम सदस्य अशा एकूण २१ नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. आठव्या टप्प्यात २ कमांडर, ७ दलम सदस्य, ३ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण १२नक्षलवाद्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला. त्यात गडचिरोलीतील ११ व चंद्रपूरातील एका नक्षलवाद्याचा समावेश आहे. नवव्या टप्प्यात २ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ४ कमांडर, २ उपकमांडर, ३५ दलम सदस्य, ४ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ४५ गडचिरोलीतील १ यवतमाळ व १ गोंदिया येथील नक्षलवाद्याचा समावेश आहे.दहाव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ३ कमांडर, ७ उपकमांडर, ६२ दलम सदस्य, २ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात ३ गोंदिया येथील नक्षलवाद्याचा समावेश आहे.अकराव्या टप्प्यात १ डिव्हीजनल कमेटी सदस्य, ६ कमांडर, ६ उपकमांडर, ७८ दलम सदस्य, ७ क्षेत्रीय व ग्रामरक्षक दल सदस्य अशा एकूण ९८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.नक्षलवाद्यांनो लोकशाहीचा मार्ग स्विकारा- शरद शेलारनक्षल चळवळीतून बाहेर निघण्यासाठी राज्य शासन व पोलिस आत्मसमर्पण योजना राबवित आहेत. जंगलात नक्षलवाद्यांविरोधात लढा देणाºया पोलिसांकड़ून जनसंवादावर विशेष भर देण्यात येत आहे. म्हणूनच सध्या मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारत आहेत. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासनाकडून आर्थिक मदत व इतर लाभ देण्यात येत आहेत. त्यामुळेच आत्मसमर्पित झालेले नक्षलवादी सध्या सुखी समाधानाचे आयुष्य जगत आहेत. त्यांना रहायला भूखंड व रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जंगलातील इतर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी