राष्ट्रवादी काँग्रेसला फटका : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी केला भाजपात प्रवेश गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण हरडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये गुरूवारी प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच ६३ कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणूका समोर असताना अरूण हरडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने याचा फार मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरूवारी भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात अरूण हरडे यांच्यासह नसिरखॉ पठाण, प्रभाकर मारगोनवार, जगदिशी वडेंगवार, मोरेश्वर माधमवार आदी २० कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्याचबरोबर काँग्रेसचे रांगी येथील पदाधिकारी प्रकाश महाराज काटेंगे, गडचिरोलीतील राकाँचे रवींद्र निंबोरकर, दिलीप पुल्लेवार, विनायक कुमरे, राजू बहिरवार, राजू तुंकलवार यांनी पक्षात प्रवेश घेतला. मौशीखांब येथील योगाजी बनपूरकर, पांडुरंग समर्थ यांनी यापूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. याच कार्यक्रमादरम्यान योगाजी बनपूरकर व पांडुरंग समर्थ यांचाही पुनर्प्रवेश घेतला. सदर पक्ष प्रवेश खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश पोरेड्डीवार, रमेश भुरसे, रेखा डोळस, प्रकाश अर्जुनवार, डी. के. मेश्राम धानोरा तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अरूण हरडेंसह ६३ जण झाले भाजपवासी
By admin | Published: December 30, 2016 1:50 AM