शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

६८ लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करणार-मुख्याधिकारी

By admin | Published: May 17, 2017 1:28 AM

चामोर्शी शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामासाठी नगर पंचायतीकडे अर्ज सादर केले.

पहिला हप्ता : अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : चामोर्शी शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामासाठी नगर पंचायतीकडे अर्ज सादर केले. त्यानंतर सर्वेक्षण करून नगर पंचायतीतर्फे १ हजार ५६८ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. नगर पंचायतीकडून चेकद्वारे पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम देण्यात आली. मात्र ६८ लाभार्थ्यांनी अद्यापही शौचालयाच्या कामास सुरुवात केलेली नाही. अशा लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चामोर्शी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी लोकमतला दिली आहे. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करून जनतेला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या उपक्रमाअंतर्गत चामोर्शी शहराला हागदारीमुक्त करण्यासाठी शासनाकडून १२ हजार व नगर पंचायतीकडून ५ हजार असे एकूण १७ हजार रूपयांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी दिले जात आहे. ज्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. त्या लाभार्थ्यांनी ३१ मे अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहन आर्शिया जुही यांनी केले आहे. चामोर्शी शहरात ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय नाही, अशा कुटुंबीयांनी नगर पंचायतीकडे अर्ज दाखल करून शौचालय योजनेचा लाभ घ्यावा, शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचा वापर नियमित करावा, असेही त्यांनी सांगितले.