कोरोनाच्या महामारीच्या काळात रुग्णांना आराेग्यविषयक साेयीसुविध मिळाव्या यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी आमदार विकास निधीतून विधानसभा क्षेत्रात आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा सातत्याने होण्यासाठी ४७ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्याचे प्रस्तावित केले हाेते. त्यांपैकी सात मशीन उपलब्ध झाल्या. सदर मशीनचे लाेकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, जिल्हा परिषदेचे सदस्य संपत आळे, मितलेश्वरी खोब्रागडे, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सदानंद कुथे, भा. ज. यु. मो.चे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, पंचायत समितीच्या सभापती नीता ढोरे, नगर परिषदेचे आरोग्य सभापती भारत बावनथडे, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिरसागर नाकाडे, उपसभापती ईश्वर पासेवार, खरेदी-विक्री समितीचे सभापती मनोज मने, उपसभापती लक्ष्मण कानतोडे, नगरसेविका सुनीता मने, गीता सेलोकर, प्रगती नारनवरे, मिथुन मडावी, युवा सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ नाकतोडे, रूपमाला वट्टी, वैरागडचे उपसरपंच भास्कर बोडणे, श्रीहरी कोपुलवार, दीपक निंबेकर, दुर्वेश भोयर, रेवतीराम मने, जागोबाजी खेडकर, प्राचार्य तेजराव बोरकर, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता रेवतकर, सुशील पोरेड्डीवार, भोजराज चांदेवार, प्रसाद साळवे, अमर बोबाटे, जितेंद्र ठाकरे, इंजिनिअर राहुल तितिरमारे, आशुतोष चव्हाण, अक्षय हेमके, संजय सोनटक्के, युगल सामृतवार, गोरक्षा कुकडकर, गोविंदा भोयर, उपसरपंच मंगेश पासेवार, अक्षय माकडे उपस्थित होते.
७ ऑक्सिजन काॅन्संट्रेटरचे लाेकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:36 AM