शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुरूमगावच्या महाराजस्व मेळाव्यात ७०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:40 AM

मुरूमगाव येथे ८ जानेवारी रोजी शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या मदतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध योजनांचे ७०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले.

ठळक मुद्देपोलिसांचा उपक्रम : योजनांच्या माहितीचे लावले स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्कमुरूमगाव : मुरूमगाव येथे ८ जानेवारी रोजी शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या मदतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध योजनांचे ७०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले.मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अजमन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार डी. एम. वाकुडकर, जि.प. सदस्य लता पुंगाटी, मुरूमगावचे सरपंच प्रियंका कुंजाम, हरीभाऊ धुर्वे, प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात, पोलीस उपनिरिक्षक सचिन पागोटे, विनोद भालेराव, अतुल नवले, मुनिर शेख, मुख्याध्यापक आकुलवार, वड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात पोलीस विभागातील सर्व कर्मचारी, शिक्षण विभाग, राजस्व विभाग, आरटीओ, कृषी विभाग व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. युवतींनी रेला नृत्य सादर केले. परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणप, जन्म दाखला, वाहन परवाना, कृषी विभागाच्या योजना, वन विभागाच्या योजना आदी बाबतचे जवळपास ७०० अर्ज प्राप्त झाले. हे सर्व अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी दिले. आश्रमशाळेतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोलीस मदत केंद्र मुरूमगावतर्फे कपड्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना एसडीपीओंनी शासकीय योजनांची माहिती कर्मचाºयांनी नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात यांनी केले.पूल बांधण्याची मागणीबोटनखेडा, कुलभट्टी, हिरंगे, पन्नेमारा, सिंदेसूर या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावर दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे. मुरूमगाव परिसरातील अनेक गावे घनदाट जंगलात वसली आहेत. या गावांना जाताना लहान-मोठे नाले पडतात. मात्र या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.मुख्यालयाबाबत तक्रारजिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, शिक्षक हे मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार केली. मुख्यालयी राहून सेवा देण्याबाबत अनेक वेळा वरिष्ठ अधिकाºयांकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्मचाºयांचे अपडाऊन सुरूच आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी केली.

टॅग्स :Policeपोलिस