लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले. दुसरीकडे वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९७३ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. तर ४९७९ ग्राहकांनी थकित असलेले वीज बिल तातडीने भरले.प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, ग्रामीण आणि शहरी पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये, यासह कृषिपंपधारकांवर कोट्यवधी रुपयांचे बिल बाकी बाकी आहे. बºयाच दिवसांपासून वीज बिल भरले नसल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीवर आर्थिक संकट आले होते. त्यातून बाहेर येण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान वीज बिल वसुली अभियान चालविण्यात आले. यादरम्यान ज्या वीज ग्राहकांनी थकित बिल भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.जिल्ह्यात गडचिरोली आणि आलापल्ली या दोन विभागात ९७३ वीज ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरली नाही. त्यामुळे त्यांचे कनेक्शन कापण्यात आले. यानंतरही काही दिवस मोहीम सुरू राहणार असल्याने वसुली अजून वाढेल.४९७९ ग्राहकांनी भरली थकबाकीया विशेष मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार ९७९ वीज ग्राहकांनी तत्काळ थकित असलेले वीज बिल जमा केले. त्यांनी भरलेल्या एकूण बिलाची रक्कम ८२ लाख ३५ हजार रुपये आहे. विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले की, २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा मोहीम सुरू राहील. ग्राहकांनी सहकार्य करून वीज कापण्याची नामुष्की येऊ देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज थकबाकीदारांनी भरले पाच दिवसात ८० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:24 AM
महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले.
ठळक मुद्देमहावितरणची विशेष मोहीम : ९७३ वीज जोडण्या कापल्या