लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारांच्या मुलाखती चामोर्शी मार्गावरील एका हॉलमध्ये मंगळवारी घेण्यात आल्या. यामध्ये तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी एकूण २६ जणांनी मुलाखती दिल्या.मुलाखती घेण्यासाठी माजी आमदार तथा काँग्रेसचे निरिक्षक आनंदराव वंजारी, कृष्णाकुमार पांडे, निरिक्षक अमर वराडे, रवींद्र दरेकर, प्रकाश इटनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, हसन गिलानी, महेंद्र ब्राम्हणवाडे, मनोहर पोरेटी उपस्थित होते. मुलाखत देणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार व जुने व नवीन काँग्रेसचे कार्यकर्ते आदींचा समावेश होता. आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी सर्वाधिक १६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. गडचिरोली विधानसभेसाठी आठ तर अहेरी विधानसभेसाठी दोन उमेदवारांनी मुलाखती दिल्या. उमेदवार व त्यांचे कार्यकर्त्यांमुळे हॉल परिसरात गर्दी झाली होती. मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाºयानेही आरमोरी विधानसभेसाठी मुलाखत दिली. सदर अधिकारी यापूर्वी गडचिरोली नगर परिषदेत नगर सेवक होते.उमेदवारांमध्ये बाचाबाचीमुलाखतीसाठी उमेदवाराला त्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याची संधी निरिक्षकांनी दिली होती. आरमोरी विधानसभेसाठी पहिली मुलाखत माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली. त्यानंतर वामन सावसाकडे यांनी मुलाखत दिली. आपल्याला समर्थन दर्शविणारेच कार्यकर्ते पुन्हा सावसाकडे यांच्याकडे आले आहेत, असा आरोप माजी आमदार गेडाम यांनी केला. यावर निरिक्षकांनी समर्थन देणारे कितीही जणाला समर्थन देऊ शकतात, असे सांगून प्रकरण मिटविले. यावरून जवळपास १० मिनिटे चांगलीच बाचाबाची झाली.
विधानसभा निवडणुकीसाठी २६ जणांनी दिली काँग्रेसकडे मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:33 AM
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारांच्या मुलाखती चामोर्शी मार्गावरील एका हॉलमध्ये मंगळवारी घेण्यात आल्या. यामध्ये तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी एकूण २६ जणांनी मुलाखती दिल्या.
ठळक मुद्देआरमोरीसाठी सर्वाधिक पसंती : जि.प.सदस्य, माजी आमदार व कार्यकर्त्यांचा समावेश