शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

८० पथदिव्यांचे बिल निघाले, खांबावर लागले ५८

By admin | Published: September 23, 2016 1:38 AM

कासवी गट ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदीत लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

कासवी ग्रा.पं.तील प्रकार : बिघडलेल्या बंद लाईटवरही लाखो रूपयांची उधळण; चार लाईट ग्रा.पं.मध्ये पडूनजोगीसाखरा : कासवी गट ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरेदीत लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. बोगस बिल जोडून ग्रामसेवकांनी हा प्रकार केला असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रा.पं. पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. कासवी गट ग्रामपंचायतीला चालू आर्थिक वर्षामध्ये १४ व्या वित्त आयोगातून १० लाख ६७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. १ लाख रूपयांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतकडून निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच सचिव व सरपंच यांनी साहित्य खरेदी केले. गावातील विद्युत खांबांवर लावण्यासाठी ४ हजार ७९० रूपये प्रत्येकी प्रमाणे ३० वॅटचे ८० पथदिवे व ६०० रूपये प्रती पाईप प्रमाणे ८० पाईप अशी ४ लाख ३१ हजार २०० रूपयांचे साहित्य खरेदी केले. प्रत्यक्ष गावात ५४ खांबांवर पथदिवे लावण्यात आले व चार पथदिवे ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून आहेत. या पथदिव्यांचा प्रकाश अत्यंत मंद असल्याचे ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पाईप व पथदिव्यासह ५ हजार ३९० रूपयाला प्रती पथदिवा पडल्याचे दर्शविण्यात आले आहे. जवळजवळ ३ लाख ५० हजार रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार यात झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. बरेचशे पथदिवे बंद असून त्यांच्यावरही लाखो रूपयांचा खर्च दुरूस्तीसाठी करण्यात आला, असे दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना कासवी ग्रा.पं.चे उपसरपंच प्रविण राहाटे म्हणाले की, ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला आम्ही कंटाळलो. त्यामुळे ग्रामविकास कार्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकाबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत चौकशी करून कार्यवाही होणे गरजेचे आहे. तर ग्रामपंचायतला पथदिवे पुरवठा करणारे कंत्राटदार हरिभाऊ सहारे म्हणाले, आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीला पथदिवे पुरविले. लाईट खराब निघाले. ३० वॅटच्या लाईटची किमत २ हजार ७५० आहे. सदर लाईट बदलून दिले जातील. (वार्ताहर)ग्रामसेवक हे नेहमीच ग्रा.पं. कार्यालयात मासिक सभेला गैरहजर राहत होते. बाहेरची चमू ग्रा.पं.मध्ये आल्यास आम्ही माहिती देत होता. १४ व्या वित्त आयोगाच्या नियोजन त्यांनी काय केले, हे कळलेच नाही. कारण मासिक सभेमध्ये सदस्यांना कामाची किंवा निधीची तरतूद कशी करायची, कुठे योग्य करायचा यावर चर्चाही झाली नाही. ग्रामसेवकांने सर्व साहित्य आपल्या मर्जीने खरेद केले आहे.- पुष्पलता तिवाडे, सरपंच, ग्रा.पं. कासवीसरपंच ,सदस्यांनी सूचविलेले काम करण्यात आले. सचिवाच्या एकट्याच्या मताने काहीही होत नाही. पथदिवे व साहित्य घेताना निविदा काढली नाही. कारण जिल्ह्यात ई-टेंडरींग करणे सुट आहे. तसेच लाईट किती वॅटचे आहेत. रेकार्ड पाहून सांगावे लागेल. १४ व्या आयोगाच्या निधीमध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.- भास्कर जंजालकर, ग्रामसेवक, गट ग्रामपंचायत कासवी