मोयाबीनपेठा येथे अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र गावातील एक विक्रेता चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्या दारूविक्रेत्याच्या घराची पाहणी केली असता, विविध प्रकारची विदेशी दारू व सुगंधित तंबाखूचे डबे आढळून आले. घटनास्थळावरून एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गाव संघटनेच्या महिला व गावातील लोकांसमक्ष पुन्हा अवैध व्यवसाय करणार नाही, विक्री केल्यास कारवाई करावी, अशी हमी त्या विक्रेत्याने दिली. त्यामुळे गावकरी व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेत संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा विक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करू, असे ठणकावून सांगितले.
बाॅक्स...
तेलंगणातून दारूचा पुरवठा
गडचिराेली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी आहे. असे असले तरी अहेरी उपविभागात देशी, विदेशी व माेहफुलाच्या दारूची विक्री सुरू आहे. सिराेंचा शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातून दारूचा पुरवठा चाेरट्या मार्गाने हाेत असताे. पाेलिसांकडून कारवाई केली जात असली, तरी चाेरट्या व आड वळणाच्या मार्गाने तसेच रात्रीच्यासुमारास दारूची आयात केली जाते. मद्यपींना ही दारू सहज उपलब्ध हाेत आहे.