शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

सहाचाकी वाहनात कोंबले ८३ विद्यार्थी

By admin | Published: September 26, 2016 1:32 AM

शासकीय आश्रमशाळेच्या तब्बल ८३ विद्यार्थ्यांना सहाचाकी वाहनात कोंबून नेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

सुरक्षा वाऱ्यावर : नागरिकांंनी वाहन रोखून दिली तंबीकुरखेडा : शासकीय आश्रमशाळेच्या तब्बल ८३ विद्यार्थ्यांना सहाचाकी वाहनात कोंबून नेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.चामोर्शी तालुक्यातील दोन शासकीय आश्रमशाळेतील तब्बल ८३ विद्यार्थ्यांना एका सहाचाकी ट्रकमध्ये गुरा-ढोरासारखे कोंबून कोरची मार्गाकडे जात असल्याचे निदर्शनास येताच काही जागरूक नागरिकांनी या वाहनाला रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जांभुळखेडा गावाजवळ थांबविले. ट्रकचालक व सोबत असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारत तंबी दिली. तसेच नियंत्रीत वेगात सुरक्षित वाहन चालविण्याची सूचना करून सदर वाहन सोडून दिले. सदर ट्रकमध्ये असलेले विद्यार्थी हे गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडा व भाडभिडी येथील शासकीय आश्रमशाळेचे होत. या विद्यार्थ्यांना कोरची तालुक्याच्या कोटगुल येथे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता वाहनाने नेत असल्याचे तेथे उपस्थित शिक्षकांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षा धाब्यावर बसविली जात असल्याचे दिसून आले. असुरक्षित प्रवास करण्यात येत असल्याने नागरिकांनी उपस्थित शिक्षकांना जाब विचारत त्यांना धारेवर धरले. कोरची मार्गावर पुढे बेडगावजवळ मोठा घाट व वळणदार रस्ता असल्याने नियंत्रित वेगात सुरक्षित वाहन चालविण्याची सूचना वाहनचालकाला करून सदर वाहन नागरिकांनी सोडून दिले. (तालुका प्रतिनिधी)