लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील ८३.६६ किमींचे रस्ते दुरूस्तीच्या कामांना बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.ग्रामीण व दुर्गम भागातील नवीन रस्ते बांधणे, जुन्या रस्त्यांची दुरूस्ती करणे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्यभरात राबविल्या जात आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ८३.६६ किमींचे रस्ते दुरूस्त केले जाणार आहेत. हे रस्ते दुरूस्त करण्यासाठी सुमारे ६५ कोटी ४६ लाख १९ हजार रूपयांचा खर्च येणार आहे. पाच वर्षांची देखभाल व दुरूस्तीसाठी ३ कोटी ८८ लाख रुपये लागणार आहेत. मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामे केली जात आहेत. या योजनेंतर्गत प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागातील मार्गांचा समावेश राहत असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती होण्यास मदत होणार आहे. कुरखेडा, कोरची, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी या चार तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी एशियन डेव्हल्पमेंट बँक यांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.पाच तालुक्यातील या रस्त्यांना मिळाली मंजुरीकुरखेडा तालुक्यातील चिचटोला ते ढुशी मार्ग, ढोलडोंगरी जोड रस्ता, भिमनपायली रस्ता, पुराडा-अंतरगाव ते चिखलधोकादा मार्ग, धनेगाव-धामेश्वर ते कत्तलवाडा मार्ग, कोरची तालुक्यातील कोटगूल ते वाको, बेडगाव ते सातपुती मार्ग, कोटगूल ते खसोडा रस्ता, सोहाले-झेंडेपार-नांदळी-जैतामपार-हेटाळकसा-जिल्हा महामार्ग जोड रस्ता, आरमोरी तालुक्यातील दवंडी-भाकरोंडी-मुस्का-खांबळा मार्ग, गडचिरोली तालुक्यातील कळमटोला चक रस्ता, शिवणी ते कृपाळा ते वाकडी रस्ता, इंदाळा ते पारडी रस्ता, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा ते रामाळा रस्ता, विष्णूपूर ते नारायणपूर ते घाट रस्ता, सोमनपल्ली-धरमपूर मार्ग, आष्टी-इल्लूर-कुनघाडा मार्ग या रस्त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. यासाठी निधी प्राप्त झाला आहे.
८४ किमी रस्त्यांची होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:56 PM
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील ८३.६६ किमींचे रस्ते दुरूस्तीच्या कामांना बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
ठळक मुद्देप्रशासकीय मान्यता प्रदान : ६६ कोटींची तरतूद, पाच वर्षे देखभालीसाठी स्वतंत्र निधी