शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

८६ हजारांची विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:32 AM

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.

ठळक मुद्देदीड लाखांचे चारचाकी वाहन पकडले : एसडीपीओंच्या पथकाची कारवाई

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.याप्रकरणी दारूविक्रेता प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल (३२) रा. रामनगर, गडचिरोली याला अटक करून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) व ९८ (क) अन्वये गडचिरोेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांना अशी माहिती मिळाली की, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल हा एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाच्या वाहनाने विदेशी दारूची वाहतूक आरमोरीकडून गडचिरोलीकडे करीत असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांनी दिली. त्यानंतर जगदाडे यांनी आपले सहकारी पोेलीस हवालदार नरूले, नाईक पोलीस शिपाई कोहपरे यांना घेऊन आरमोरी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान आरमोरीवरून एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाचे वाहन येताना दिसले. या वाहनाला खरपुंडी नाक्यावर थांबवून वाहनचालकाचे नाव विचारले असता, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल असे त्यांनी सांगितले. वाहनातून विदेशी कंपनीच्या १८० मिली मापाच्या २८८ निपा आढळून आल्या. या दारूची किंमत ८६ हजार ४०० रूपये आहे. तर वाहनाची किंमत १ लाख ५५ हजार रूपये आहे.सदर दारू व वाहनाचा पोलिसांनी पंचनामा केला. वाहनाच्या मागील सिटवर नायलॉयनच्या पिशव्यांमध्ये इंपेरियल ब्ल्यू कंपनीच्या दारूच्या बाटला आढळून आल्या. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून दारू जप्त केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक जगदाडे करीत आहेत. यापूर्वीही गडचिरोली येथील एसडीपीओंच्या पथकाने चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात दारू पकडून दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र काही दिवसानंतर पुन्हा चोरट्या मार्गाने दारूची आयात वाढली आहे.शहरातील दारूविक्रीला लगाम लावण्याची मागणीजिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असली तरी गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डात चोरीछुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. युवकही दारूच्या आहारी गेले आहेत. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहरातील दारूविक्रीला आळा घालावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह महिलांकडून होत आहे. धडक मोहीम राबविण्याची मागणी आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी