लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत शासनाने गडचिरोली आगाराला ४२ तर अहेरी आगाराला ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व बसेस विद्यार्थिनींना गाव ते शाळेच्या ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.गडचिरोली जिल्हा मागास आहे. तसेच मानव विकास निर्देशांक सुध्दा कमी आहे. याची कारणमिमांसा केली असता, प्रामुख्याने मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. गावापासून १० ते १५ किमी अंतरावर शाळा आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने विद्यार्थिनी शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. त्यामुळे शासनाने प्रत्येक आगाराला मोफत बस उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळांच्या मागणीनुसार सदर बसेस चालविण्याची सक्ती राज्य परिवहन महामंडळावर करण्यात आली आहे. गडचिरोली आगाराला ४२ तर अहेरी आगाराला ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. देसाईगंज तालुका वगळता सर्वच अकराही तालुके मानव विकास मिशनमध्ये मोडतात. या सर्व तालुक्यांना बसेस उपलब्ध झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच बसेस मिळाल्याने विद्यार्थिनींची गैरसोय टळली आहे.पासेससाठी विद्यार्थ्यांची कसरतगडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांचा व्याप १०० ते १२५ किमीचा आहे. पासेस मिळण्याची सुविधा केवळ तालुकास्तरावर उपलब्ध आहे. काही तालुक्यांमध्ये तर ही सुविधा सुध्दा नाही. शाळा सुरू होताच बस पासेस काढण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र अनेक तालुक्यांमध्ये बस पास काढण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. प्रत्येक तालुकास्तरावर महिन्यातील काही दिवस एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.बसस्थानकांचा प्रश्न मार्गी लागलागडचिरोली जिल्ह्यात केवळ गडचिरोली व अहेरी येथेच आगार व बसस्थानक होते. तालुकास्थळी सुध्दा बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. बसस्थानक निर्मितीवर एसटीने विशेष भर दिला आहे. आलापल्ली येथील बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. अहेरी व गडचिरोली बसस्थानकाच्या विस्तार केला जात आहे. सिरोंचा येथे बसस्थानक बांधण्यासाठी निविदा काढून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी २ कोटी २७ लाखांचे बांधकाम होणार आहे. गडचिरोली विभागीय कार्यालय व आदिवासी विद्यार्थी चालक प्रशिक्षण केंद्रासाठी ५ कोटी १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कामाचे वर्कआॅर्डर सुध्दा दिले आहेत. लवकरच कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आष्टीत कर्मचारी नेमाआष्टी हे चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती व मोठे गाव आहे. या ठिकाणी पास काढण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली होती. मात्र येथील कर्मचाºयाला अहेरी येथे बोलविण्यात आले. त्यामुळे आष्टी परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अहेरीला जाणे अशक्य होत असल्याने काही विद्यार्थी गोंडपिपरी येथील आगारात जाऊन पास काढत आहेत. आष्टी येथे पास काढण्यासाठी हे कर्मचारी नेमावा, अशी मागणी अहेरी आगार प्रमुखाकडे केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे नगरमंत्री आदेश मंचलवार, अक्षय मुत्तेमवार, रोशन घ्यार, जिल्हा संघटनमंत्री अक्षय राजुरकर यांनी केली आहे.
९१ बसेस जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:09 AM
मानव विकास मिशन अंतर्गत शासनाने गडचिरोली आगाराला ४२ तर अहेरी आगाराला ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व बसेस विद्यार्थिनींना गाव ते शाळेच्या ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
ठळक मुद्देगैरसोय टळली : मानव विकास मिशन योजना