गडचिराेली : जिल्ह्यातील काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात येत असून बाधित रूग्णांची संख्या कमी हाेत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नवीन ९ बाधित रूग्ण आढळल्यास ११ रूग्णांनी काेराेनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९ हजार ३०७ बाधित रूग्ण हाेते. यापैकी ९ हजार १०९ रूग्णांनी काेराेनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य:स्थितीत ९३ क्रियाशील बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १०५ जणांचा मृत्यू काेराेनामुळे झाल्याची नाेंद आहे. जिल्ह्यातील काेराेना रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९७.८७ टक्के आहे. तर क्रियाशील रूग्णाचे प्रमाण १ टक्के आहे. जिल्ह्यात काेराेना बाधित मृत्यूचा दर १.१३ टक्के आहे. नवीन ९ बाधित रूग्णांमध्ये गडचिराेली तालुक्यातील ६, भामरागड १, धानाेरा १ व देसाईगंत जालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.
९ बाधित तर ११ काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:37 AM