तालुक्यातील विष्णूपूर जंगल परिसरात हातभट्टी मोहदारू टाकून ठेवल्याची माहिती मिळाली. चामोर्शी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या पाेलिसांनी विष्णूपूर गावापासून १ किमी अंतरावर नाल्याच्या बाजूने जंगल परिसरात हातभट्टी मोहादारू गाडण्यासाठी टाकून ठेवलेला ६८८० लिटर गुळमोहाचा सडवा (किंमत ६,८८,००० रुपये) मोहा सडवा टाकण्यासाठी वापरण्यात आलेले ३० नग प्लास्टिक ड्रम (किंमत १५००० रुपये) असा एकूण ७,०३,००० रु. किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यात आरोपी निशी नीतय हलदर, विश्वजीत नितय हलदर, सुबोल बाला सुकेन शंकारी सर्व रा. विष्णूपूर ता. चामोर्शी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला.
दुसऱ्या कारवाईमध्ये त्याच भागात विष्णूपूर गावापासून १ किमी अंतरावर नाल्याच्या बाजूने जंगल परिसरात हातभट्टी मोहादारू गाडण्यासाठी टाकून ठेवलेला २८०० लिटर गुळमोहाचा सडवा (किंमत २,८०,००० रुपये) व मोहा सडवा टाकण्यासाठी वापरण्यात आलेले १० नग प्लास्टिक ड्रम (किंमत ५००० रुपये) असा एकूण २,८५,००० रु. किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यात आरोपी दिनेश दुलाल मंडल, नरेन नोनी हलदर, परिमल बिमल विश्वास व मनोज खितिष मंडल सर्व रा. विष्णूपूर ता.चामोर्शी यांच्यावर पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, चामोर्शीचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, सहायक फाैजदार रमेश कोडापे, दादाजी करकाडे, पाेलीस हवालदार नीलकंठ पेंदाम, पुष्पा कन्नाके, मंगेश राऊत, सुनील पुटवार, शेषराज नैताम आदींनी केली.
===Photopath===
160621\img-20210616-wa0050.jpg
===Caption===
चामोर्शी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीची संयुक्त कारवाई फोटो