शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

जिल्ह्यातील ९० रेती घाटांचा होणार लिलाव

By admin | Published: November 02, 2014 10:34 PM

जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण

दिलीप दहेलकर - गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ३ घाट अयोग्य दाखविण्यात आल्याने ते रद्द झाले आहेत. जिल्ह्यातील ९० रेती घाटांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे ३१ आॅक्टोबर रोजी पाठविले आहेत. त्यामुळे आता ९० रेती घाटांचा लिलाव होणार आहे.पर्यावरणाच्या मंजुरीकरीता सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांसह ग्रामसभेचे ठराव व रेती घाटांचा गाव नकाशा आवश्यक असतो. त्यामुळे तहसीलदारांकडून रेती घाट लिलाव घेण्यास हरकत नसल्याचे ठराव व गाव नकाशा प्राप्त होताच पर्यावरण विभागाची मंजुरी प्राप्त करण्यासाठी फार्म १ मध्ये तयार करून प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने अंतिम मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे सदर ९० रेती घाटांचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर ई-निविदा प्रक्रिया राबवून रेती घाटांचा लिलाव करण्यात येणार आहे. साधारणत: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अथवा जानेवारी महिन्यात या रेती घाटांचा लिलाव होऊन रेती घाट सुरू होणार असल्याची शक्यता आहे. आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील योग्य घाटांमध्ये अहेरी तालुक्यातील महागाव बुज, वांगेपल्ली, चिंचगुंडी, एटापल्ली तालुक्यातील आलदंडी, सेवारी, भामरागड, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, गोविंदपूर, गोमणी, विश्वनाथ नगर १, विश्वनाथ नगर २, चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम, गणपूर रै, इल्लूर, तळोधी मो., दोटकुली, मोहुर्ली मो., एकोडी, कुरूड, जोगना, घारगाव, पारडीदवे, मुरमुरी, धानोरा तालुक्यातील चिचोली, कारवाफा, बांदोना, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, आमगाव आदीसह ८ रेती घाटांचा समावेश आहे.