शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

908 अग्निरक्षक राेखणार वणवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 5:00 AM

आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जंगलात लागणाऱ्या आगींमुळे जैवविविधतेचे माेठे नुकसान हाेते. त्यामुळे आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागामार्फत विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी वणव्यांवर आळा घालण्यासाठी सुमारे ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आगी लागण्यास सुरुवात हाेते. मात्र, महिनाभरापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे आगी लागण्यास उशिर हाेत आहे. मात्र, माेह व तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर जंगलाला आगी लागण्यास सुरुवात हाेणार आहे. आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महिने कायमस्वरूपी राेजगार उपलब्ध हाेतो. अग्निरक्षक हा वनरक्षकाला आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत करणार आहे. 

मागील वर्षी ६,८३४ हेक्टर आगीच्या विळख्यातमागील वर्षी जंगलात आग लागण्याच्या २ हजार ४४१ घटनांची नाेंद झाली. या घटनांमध्ये ६ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर आग पसरली. आगीमुळे जंगल व जैवविविधतेचे माेठे नुकसान झाले. 

१३ हजार किमी फायरलाईन जाळणार

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायरलाईनचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वनविभाग जास्तीत जास्त फायरलाईन जाळण्याचा प्रयत्न करते. यावर्षी वनविभागाने केलेल्या   नियाेजनानुसार १२ हजार ७२५ किलोमीटर एवढी फायरलाईन जाळली जाणार आहे. 

जंगलातून जाणारे रस्ते, पायवाटांवरचे गवत वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जाळले जाते. या ठिकाणचे गवत अगाेदरच जळले असल्याने उन्हाळ्यात आग लागली तरी ती आग  पुढे पसरत नाही. काही जागा समांतर रेषेत जाळली जाते. त्याला फायरलाईन (जाळरेषा) असे म्हटले जाते.

ग्रामसभांना ताकीद-   तेंदूपत्त्यासाठी कंत्राटदाराने आग लावण्यास ग्रामसभांनी प्रतिबंध घालावा, अन्यथा संबंधित ग्रामसभा तसेच कंत्राटदार यांच्या विरूध्द कारवाई केली जाणार आहे. तसेच आग लागू नये, यासाठी संबंधित ग्रामसभेने अग्निरक्षक नेमावे, असे निर्देश ग्रामसभेला देण्यात आले आहेत.

काय आहे फायर अलर्ट?

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायर अलर्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आकाशात असलेले सॅटेलाईट आगीच्या घटनेची नाेंद घेते व तसा संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविते. हा संदेश लगेच वनरक्षकाला प्राप्त होतो. वनरक्षक व त्याची यंत्रणा त्या ठिकाणी पाेहाेचून आग आटोक्यात आणणतात. त्यामुळे आगीचा विस्तार थांबण्यास माेठी मदत हाेते. 

 

टॅग्स :fireआगforestजंगल