लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी (दि.३) ९४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याचवेळी १०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६११० झाली आहे. त्यापैकी ५२०२ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात ८४८ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.मंगळवारी कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे एकुण ६० जणांचा आकडा कायम आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१४ टक्के, तर क्रियाशिल रुग्णांचे प्रमाण १३.८८ टक्के आहे. मृत्यूदर ०.९८ टक्के झाला आहे.नवीन ९४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २७, अहेरी १८, आरमोरी ३, भामरागड ९, चामोर्शी ८, धानोरा ४, एटापल्ली २, कोरची ४, कुरखेडा ५, मुलचेरा ४, सिरोंचा २ आणि देसाईगंज येथील ८ जणांचा समावेश आहे.मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या १०४ रूग्णांमध्ये गडचिरोली ४७, अहेरी ५, आरमोरी ६, भामरागड ४, चामोर्शी २२, धानोरा १, एटापल्ली ७, मुलचेरा १, सिरोंचा १, कोरची ५, कुरखेडा ४ आणि देसाईगंजमधील १ जणाचा समावेश आहे.अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये येंकापल्ली १, स्थानिक ७, आलापल्ली ६, नागेपल्ली १, फॉरेस्ट कॉलनी राम मंदिराजवळ आलापल्ली १, बँक ऑफ इंडिया जवळ पोलीस स्टेशन अहेरी २, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये मन्नेराजाराम १, स्थानिक ६, पोलीस स्टेशन १, नगर पंचायतजवळ १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये पोलीस मदत केंद्र घोट १, रेगडी १, स्थानिक ५, विवेकनंद नगर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 3, सीडीपीओ कार्यालय 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये दवंडी १, स्थानिक ३ जणांचा समावेश आहे.कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, गेवर्धा १, पलासगड १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये बोलेपल्ली १, स्थानिक २,भवानीपूर १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये पीएचसी अंकिसा १, अंकिसा १, आणि देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये तुकुम वार्ड १, एसआरपीएफ कॅम्प विसोरा येथील ६, स्थानिक १, तसेच इतर तालुक्यातील बाधितांमध्ये एका जणाचा समावेश आहे.गडचिरोली तालुक्यात आढळले २७ रूग्णनवीन बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील शाहूनगर येथील १, कॅम्प एरिया २, मेडिकल कॉलनी १, कॉम्पलेक्स २, रेव्हेन्यु कॉलनी १, नवेगाव पेट्रोल पंपाजवळ ३, पोलीस पलटन कॉलनी १, जीएनएम हॉस्टेल १, गोगांव १, कन्नमवार वार्ड १, कोटगल १, दुर्गा नगर एमआयडीसी रोड १, साई नगर १, टी-पॉईट चौक १, पोलीस हेडक्वार्टरजवळ १, गोकुल नगर १, रेड्डी गोडाऊनजवळ १, रामपुरी वार्ड १, स्नेहनगर वार्डातील एका रूग्णाचा समावेश आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत गडचिरोली तालुक्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
९४ नवीन रुग्णांची भर, तर १०४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 5:00 AM