शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सात महिन्यात ९९ नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:13 PM

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला.

ठळक मुद्दे७५२ माता जोखीमपूर्ण : ४६ उपजत तर ५३ बालकांनी अर्भकावस्थेत सोडला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला. मातेच्या सुदृढपणाचा अभाव आणि गर्भावस्थेतील बालकाच्या कुपोषणासोबतच काही प्रसंगात योग्य उपचारांचा अभाव ही या बालमृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत.जिल्ह्यातील देसाईगंज वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवेअंतर्गत विविध सुविधा पुरविल्या जातात. याअंतर्गत ग्रामीण भागात गेल्या ७ महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आरोग्य विभागाने विविध शिबिरे आणि गरोदर मातांच्या तपासणी व उपचारावर ३३ लाख ५२ हजार रुपये खर्च केल्याचे दिसून येते. मात्र यादरम्यान ४६ बालकांचा उपजतच तर ५३ बालकांचा अर्भकावस्थेत असताना मृत्यू झाला. याशिवाय ७ गरोदर मातांना जीव गमवावा लागला. गर्भावस्थेत आवश्यक असलेल्या पोषक घटकांअभावी महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण बरेच आहे. परिणामी वेळेवर योग्य तो पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे गर्भातील बाळाला मातेच्या आहारातून मिळणाऱ्या पोषक घटकांपासून वंचित राहावे लागून त्याची योग्य प्रकारे वाढ होत नाही. गर्भातच त्याचे असे कुपोषण होत असल्याने तो सुदृढ होत नाही. पोटातील बाळ किती सुदृढ आहे याची वेळोवेळी तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे असते. पण दुर्गम भागात या तपासण्या होत नाही. त्यामुळे बाळाचा उपजत अवस्थेतच मृत्यू होतो. गेल्या सात महिन्यात यामुळेच ४६ बालक दगावले आहेत.१८६ शिबिरातून तपासणी व उपचारगर्भवती महिलांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालक तथा त्यांच्या मातांची तपासणी करण्यासाठी एप्रिल ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ४४० शिबिरांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १८६ शिबिरे घेण्यात आली. कुरखेडा आणि गडचिरोली तालुका वगळता इतर सर्व तालुके ही शिबिरे घेण्यात मागे पडले. सिरोंचा तालुक्यात तर सात महिन्यात एकही शिबिर झाले नाही. एटापल्ली तालुक्यात अवघे २ तर कोरची तालुक्यात ४ शिबिरे झाली. संबंधित तालुका आरोग्य अधिकाºयांचा ढिसाळपणा हेसुद्धा बाल व मातामृत्यू मागील एक कारण ठरत आहे.एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणात एटापल्ली तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येते. या तालुक्यात गेल्या सात महिन्यात १२ बालकांचा उपजत मृत्यू तर १८ बालकांचा अर्भकावस्थेत मृत्यू झाला आहे. याशिवाय २ मातांचाही मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यात ६ उपजत तर ७ अर्भक मृत्यू झाले आहेत. तसेच एका मातेलाही जीव गमवावा लागला. या तालुक्यात आरोग्य सेवेत सुधारणा करण्यास वाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूGadchiroliगडचिरोली