शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

By admin | Published: June 16, 2014 11:29 PM

निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

नक्षल्यांची दहशत : ९७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूकदिगांबर जवादे - गडचिरोलीनिवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या एकूण ९९ ग्रामपंचायतीत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी केवळ १० नामाकंन भरण्यात आले आहेत. नक्षल्यांकडून लोकप्रतिनिधींची केली जाणारी हत्या व त्या गावामध्ये त्या प्रवर्गाचा उमेदवार नसणे हे कारण माणले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामध्ये मोडतात. नक्षल्यांचा लोकशाही व्यवस्थेस विरोध असल्याने ते निवडणुकीचा प्रचंड प्रमाणात राग करतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरीही हल्ले करतात. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक निवडणुकीमध्ये सहजासहजी सहभाग घेत नाही. एवढेच नाही तर कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच पद सांभाळण्यासही तयार होत नाही. अहेरी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र रोटेशननुसार इतरही प्रवर्गांना ग्रामपंचायतमध्ये आरक्षण दिले जाते. कधी-कधी या प्रवर्गाचा नागरिकच त्या ग्रामपंचायतीमध्ये राहत नसल्याने अर्ज भरल्या जात नाही. पर्यायाने त्या ठिकाणची जागा शिल्लक राहते. निवडणूक आयोगाने अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेगुलवाही या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व त्याच तालुक्यातील इतर २१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येडमपल्ली ही ग्रामपंचायत नक्षलग्रस्त भागात येते नुकत्याच लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या. नागरिकांमध्ये दहशत असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून जीवाची जोखीम उचलण्याची त्यांची तयारी नाही. या ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. रेगुलवाही येथे केवळ तीन नागरिकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. इतर २१ ठिकाणी मात्र एकही नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एटापल्लीच्या पं.स. सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची १० दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली. याच तालुक्यातील सुमारे २३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र एकही नामांकन अर्ज आला नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.