शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

शेळ्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत

By संजय तिपाले | Published: July 16, 2024 12:07 PM

जोशीटोला गावातील घटना: बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग कामाला

गडचिरोली: आधी गायीवर हल्ला, त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांची शिकार करण्यासाठी झेपावलेला बिबट्या विहिरीत कोसळला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथे १६ जुलै रोजी पहाटे घडली. दरम्यान, बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी आता वनविभाग कामाला लागला आहे.  जोशीटोला गावालगत रघुनाथ बनसोड यांचे शेत आहे. तेथेच त्यांची विहीर असून जवळच गुरांचा गोठाही आहे. १६ जुलै रोजी पहाटे दोन वाजता बिबट्याने त्यांच्या गोठ्यातील गायीवर हल्ला केला. यात गाय जखमी झाली. त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडला. बिथरलेल्या बिबट्याने नंतर शेळ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच दरम्यान अंधारात तो विहिरीत कोसळला.  पहाटे ही बाब शेतकरी बनसोड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने वनविभागाला संपर्क केला.  सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्याला पाईपाचा आधारदरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा बोलावला. मात्र, विहिरीचा आकार अवघ्या चार फुटांचा आहे. त्यामुळे पिंजरा आत सोडणे कठीण बनले आहे. त्यामुळ छोटा पिंजरा मागवला आहे. तूर्त बिबट्यासाठी लाकडी पाट सोडण्यात आला असून सध्या तो पाईपाला बिलगून बसलेला आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली