शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

संपत्तीच्या वादातून दाम्पत्याला संपविले; वृद्धाचाही मृतदेह नदीपात्रात आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 9:39 PM

पाच नातेवाईकांना घेतले ताब्यात : करपनफुंडीतील हत्या प्रकरण

गडचिराेली : एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी गावापासून ५ किमी अंतरावर शेतातील झाेपडीत वास्तव्य करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह बांडे नदीत मंगळवारी आढळला हाेता, तर महिलेचा पती बेपत्ता हाेता. बेपत्ता पतीचा मृतदेह घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीपात्रातच बुधवारी आढळला. सुरूवातीला जादूटाेण्याच्या संशयातून महिलेची हत्या झाल्याचा संशय पाेलिसांना हाेता; परंतु सखाेल चाैकशी सुरू असतानाच संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समाेर आले. याप्रकरणी पाेलिसांनी पाच नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.

एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी गावातील बुर्गाे रैनू गाेटा (५५) या महिलेचा मृतदेह मंगळवारी बांडे नदीपात्रात आढळला हाेता, तर तिचा पती रैनू जंगली गाेटा (६०) हा बेपत्ता हाेता. करपनफुंडी गावापासून ५ किमी अंतरावरील जांभिया व बांडे नदीच्या संगम किनारी असलेल्या शेतातील झाेपडीत हे दाम्पत्य वास्तव्य करीत हाेते. शनिवार, २४ ऑगस्टपासून ते दाेघेही बेपत्ता हाेते. कुटुंबीय त्यांचा शाेध घेत असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता नदी संगम परिसरात कुजलेल्या स्थितीत बुर्गाे गाेटा हिचा मृतदेह आढळून आला. मात्र, पती रैनू गाेटा हा बेपत्ता हाेता. बुधवारी त्याचा मृतदेह घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीपात्रातच आढळला.

झाडाझडतीमध्ये नातेवाईकांची कबुलीपाेलिसांना सुरूवातीला जादूटाेण्याच्या संशयातून महिलेची हत्या झाली असावी, असा संशय हाेता; परंतु तपासाची चक्रे फिरवताच काही नातेवाईकांवर संशय आला. त्यानंतर पाच नातेवाईकांना ताब्यात घेऊन झाडाझाडती घेतली असता संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचे समाेर आले, अशी माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी सखाेल तपास बुर्गी पाेलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी साेमनाथ पुरी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी