शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

लोहखनीज वाहतूक करणाऱ्या जड वाहनाने घेतला शिक्षकाचा बळी; आलापल्लीत पोलीस चौकीसमोरच चिरडले

By संजय तिपाले | Published: May 20, 2023 3:51 PM

२० दिवसांत चार जणांनी गमावले प्राण

गडचिरोली: सूरजागड खाणीतील लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. आलापल्ली (ता.अहेरी) येथे पोलिस चौकीसमोरच जड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला. ही घटना २० मे रोजी दुपारी पावणे तीन वाजता घडली.

वसुदेव मंगा कुळमेथे (४५,रा.नागेपल्ली ता.अहेरी)असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते एका आश्रमशाळेत कार्यरत होते. ते आलापल्लीहून नागेपल्लीकडे जात होते. आलापल्लीत पोलिस चौकीसमोरच लोहखनीज घेऊन सूरजागडहून आष्टीकडे जाणाऱ्या जड वाहनाने (एमएच ३४ बीझेड-५५८८) दुचाकीला पाठीमागून धडक दिली, यात दुचाकीवरील वसुदेव कुळमेथे हे जागीच गतप्राण झाले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रक अंगावरुन गेल्याने घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक जागेवरच उभा करुन चालक पोलिस चौकीत हजर झाला. त्यास पोलिसांनी ताब्यातघेतले. त्यानंतर रस्त्यावरील ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. वसुदेव कुळमेथे यांचा मृतदेह अहेरी ग्रामीण रुग्णालयात हलविला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.  लोहखनीज वाहतूक उठली जिवावर

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील खाणीतून लोहखनिजाची शेकडो वाहनांतून रोज बेसुमार वाहतूक सुरु आहे. यामुळे अपघात वाढले आहेत. मुरखळा येथे ३० एप्रिलला लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोघांचा बळी घेतला होता, त्यानंतर चामोर्शी तालुक्यात लोहखनिजाच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी घडली होती, तर २० मे रोजी शिक्षक वसुदेव कुळमेथे यांचा बळी गेला. सततच्या अपघातांमुळे लोहखनीज वाहतूक सामान्यांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत असून स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोलीDeathमृत्यू