गडचिराेली : वाढत्या काेराेना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिल ते १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत निराधारांना आधार देण्याच्या उद्देशाने एक महिन्याचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाभरात एकूण १ लाख २९ हजार ७४० निराधारांना याचा लाभ मिळणार आहे.
निराधार व्यक्तींचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून संजय गांधी निराधार याेजनेंतर्गत विविध प्रकारच्या याेजना राबविल्या जातात. या याेजनांतर्गत लाभार्थ्याला प्रतिमाह थेट एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात या सर्व याेजनांचे एकूण १ लाख २९ हजार ७४० लाभार्थी आहेत.
मागील १५ दिवसांपासून काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी संचारबंदी हाच एकमेव पर्याय असल्याने राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीमुळे बहुतांश आर्थिक व्यवहार ठप्प पडणार आहेत, तर इतर नागरिकांसाेबतच निराधार नागरिकांचीही राेजीराेटी हिरावली जाणार आहे. आधीच हा वर्ग आर्थिक परिस्थितीने अतिशय नाजूक आहे. अशातच राेजगार गेल्याने या वर्गाचे हाल हाेण्याची शक्यता आहे. त्यांना थाेडा दिलासा म्हणून एक महिन्याचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
बाॅक्स....
शासनाने मागितली माहिती
अतिरिक्त अनुदानाची रक्कम लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या हालचाली शासनामार्फत सुरू झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे. अतिरिक्त एक महिन्याचे अनुदान देण्याबराेबरच एप्रिल महिन्याचे अनुदान ॲडव्हॉन्समध्ये उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षीही केंद्र शासनाने लाॅकडाऊनच्या वेळी एक महिन्याचे अतिरिक्त अनुदान दिले हाेते.
लाभार्थी काय म्हणतात...
काेट...
निराधारांना प्रत्येक महिन्याला अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नियमित अनुदान कधीच दिले जात नाही. एक ते दाेन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर अनुदान दिले जाते. मार्च महिन्याचे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नाही. अतिरिक्त अनुदान लवकर जमा करावे.
-लहुजी मेश्राम
काेट...
संचारबंदीमुळे हातातील काम गेले आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त अनुदान देणार असल्याची माहिती मिळाली. याची अंमलबजावणी मात्र वेळेवर हाेणे आवश्यक आहे. संकट गेल्यानंतर पैसा मिळून काहीच फायदा हाेत नाही.
-शंकर मिसार
काेट...
अतिरिक्त अनुदान देण्याबराेबरच एक महिन्याचे ॲडव्हॉन्स अनुदान देणार असल्याचे माहीत झाले आहे. दाेन्ही अनुदान एकाचवेळी देण्याची गरज आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे अनुदानही मिळाले नाही. ते त्वरित देण्याची गरज आहे.
-पांडुरंग धाेडरे
काेट....
निराधार व्यक्तींची काळजी घेेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सद्य:स्थितीत शासनाकडून मासिक केवळ एक हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. वाढती महागाई लक्षात घेतली, तर एवढे अनुदान पुरत नाही. औषधांवरही अतिरिक्त खर्च करावा लागताे. त्यामुळे शासनाने अनुदान देण्याची गरज आहे.
-शिवराम राऊत
बाॅक्स....
संजय गांधी निराधार याेजना - २३,४५१
श्रावण बाळ याेजना - ६६,५३६
इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन याेजना - ३६,३६७
इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन याेजना - २,९५१
इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन याेजना - ४३५