पाेलीस मदत केंद्र नारगुंडा येथे २३ व २४ सप्टेंबर राेजी पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत शिबिर घेण्यात आले. वीजपुरवठा व माेबाइल नेटवर्क वारंवार खंडित हाेत असल्याने दाेन दिवस शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आयुष्यमान भारत गोल्डन विमा कार्ड तसेच आधार कार्ड नोंदणी व नूतनीकरण करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांना परिसरातच सुविधा मिळाल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता लागणारा वेळ, पैसा व श्रम आदींची बचत झाली. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.
शिबिरादरम्यान प्रभारी अधिकारी पीएसआय कुणाल चव्हाण, पीएसआय मनोहर क्षीरसागर व पोलीस अंमलदार रवींद्र कुमरे, बाबूराव मडावी, सुधाकर मडावी, देवाजी नैताम, लक्ष्मीनारायण टेंभरे, सोपान अंकाडे, बालमुकुंद मेश्राम, गणेश नागरे, चेतन लांबुवार, रविशंकर बुल्ले, रामकिशन बलदे, साजन बांबोळे, शंकर मस्के, जनार्दन भुरसे तसेच महिला पोलीस अंमलदार योगीता वाढई उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी श्वेता कोटरंगे, सरिता मडावी, अस्मिता बगमारे, प्राची भोयर, संध्या सपाट, दीक्षा कावळे, पूजा सोनवाने, भाग्यश्री शेरकी, निपिशा पेंदाम व संगणक परिचालक महेंद्र कोठारे यांनी सहकार्य केले.
260921\img-20210925-wa0004.jpg
आधारकार्ड आयुष्यमान नोंदणी करताना