लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/एटापल्ली : जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या २० ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निकालात आदिवासी विद्यार्थी संघाने बाजी मारली. ४ पैकी ३ जागी विजय विजयी मिळवत आविसंने आपले वर्चस्व तर काँग्रेसने एक सरपंचपद पटकावत आपले अस्तित्व दाखविले आहे. ईश्वचिठ्ठीत आवलमारीच्या एका जागेवर राष्ट्रवादीच्या सदस्य निवडून आल्या. मात्र या निवडणुकीतील भाजपला जोरदार झटका बसला आहे.२० ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यांची अविरोध निवड झाल्याने त्या ठिकाणी बुधवारी मतदान झाले नाही. तर गर्देवाडा, वांगेतुरी आणि मेंढरी या तीन ग्रामपंचायतींमध्ये कोणीही नामांकन भरले नाही. त्यामुळे केवळ चार ठिकाणी मतदान झाले. त्यात अहेरी तालुक्यातील आवलमरी ग्रामपंचायतीवर सरपंचासह आविसंचे ८ सदस्य निवडून आले. येथील सरपंच म्हणून सुनंदा व्यंकना कोडापे विजयी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक ३ मध्ये आविसंचे मारोती मडावी व राष्ट्रवादीचे खुशाल तलांडी यांना समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे तलांडी विजयी झाले.एटापल्ली तालुक्यातील सेवारीच्या सरपंचपदी आविसंच्या मिना घिसु करंगामी, सरखेडाच्या सरपंचपदी आविसंच्या शांता शिवाजी उसेंडी तर वडसा(खुर्द)च्या सरपंचपदी काँग्रेसच्या मंदा शालिकराम गेडाम यांची निवड झाली. कॉग्रेसच्या विजय रॅलीत जि.प. सदस्य संजय चरडुके, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, पं.स. सदस्य शालिकराम गेडाम आदी सहभागी झाले होते.आविसंच्या विजय रॅलीत जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प.सदस्य सारीका आईलवार, पं.स.उपसभापती नितेश नरोठे, प्रज्वल नागुलवार, रमेश वैरागडे, राजू गोमाडी, मंगेश हलामी, खुशाल गावतुरे आदी सहभागी झाले होते.अहेरी येथे जि.प.सदस्य अजय नैताम, सुनीता कुसनाके, पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, इंदारामचे सरपंच गुलाबराव सोयाम, वट्राचे सरपंच रवींद्र आत्राम, नागेपलीच्या सरपंच सरोज दुर्गे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. अहेरी विधानसभा मतदार संघावर भाजपचे प्रतिनिधी आहे. मात्र या निवडणुकीत इतर पक्षांनी मारलेली बाजी पाहता भाजपची पकड कमी झाल्याचे दिसते.
सरपंचपदांवर ‘आविसं’चे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:48 PM
जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या २० ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निकालात आदिवासी विद्यार्थी संघाने बाजी मारली. ४ पैकी ३ जागी विजय विजयी मिळवत आविसंने आपले वर्चस्व तर काँग्रेसने एक सरपंचपद पटकावत आपले अस्तित्व दाखविले आहे.
ठळक मुद्देकाँग्रेसला एक जागा : भाजपला जोरदार झटका, ईश्वरचिठ्ठीत राष्ट्रवादीला संधी