शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

शहरातील बेवारस प्लास्टिक जातेय जनावरांच्या पोटात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 4:12 PM

जनावरांच्या जिवाला धोका : कठोर कारवाईची आवश्यकता, प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शहरात दिवसेंदिवस बेवारस जनावरांची संख्या वाढत चालली आहे. ही बेवारस जनावरे दिवसभर मुख्य रस्त्याने फिरत असतात. तर कधी रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. ही जनावरे प्लास्टिक खाऊन जीवन जगताना दिसून येत आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

चामोर्शी तालुका मुख्यालयात व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिक उरलेले अन्न जनावरांना खाऊ घालतात. त्यामुळे ही जनावरे हॉटेल असलेल्या परिसरात अधिक दिसून येतात. जनावरे दिवसभर रस्त्याने भटकंती करीत असल्याने दुचाकी तसेच इतर वाहनांना पिशवी दिसली की त्या वाहनाजवळ जाऊन पिशवी फाडून त्यातील वस्तू फस्त करीत आहेत.

एवढेच नव्हे तर कागद, प्लास्टिक इतर वस्तू सर्रास खाताना दिसून येत आहेत. शहरात मोकाट जनावरांच्या आरोग्यासाठी जनावरांचे मालक फारसे गंभीर नसल्याने जनावरे कागद, प्लास्टिक यांना चारा समजून खाताना दिसून येत आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही. दिवसेंदिवस जनावरांची संख्या अनेक कारणांमुळे घटत आहे. तर एकीकडे बेवारस जनावरे शहरात आढळून येत आहेत. बेवारस जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शहरात नगरपंचायतकडून अनेकदा जनजागृती करून हॉटेल, दुकाने तसेच बाजारात पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यावर १०० टक्के आळा बसला नाही.

 

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानीप्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल, ग्लास आणि प्लेट आदी वस्तू वापरून फेकून दिल्यावर ती वर्षानुवर्षे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किवा नद्या आणि समुद्रात साचून राहतात. त्यामुळे देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे. तरीही प्लास्टिकचा वापर अनेक प्रकारे सर्रासपणे सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्याची आवश्यकता आहे.

"शहरात प्लास्टिक निर्मूलनासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून पथक नेमले आहेत. त्या पथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आठवडी बाजार, हॉटेल, व्यावसायिकाच्या दुकानात पथक भेट देत असतात. यापूर्वी प्लास्टिक पिशव्या जप्तीतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक पिशव्यामुक्तीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखावे. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे."- श्रीकांत फागणेकर, मुख्याधिकारी न.पं., चामोर्शी

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीGadchiroliगडचिरोली