लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.बोडधा येथील यादवराव गायकवाड व त्यांचा मुलगा राजू गायकवाड हे त्यांच्या स्वमालकीच्या एमएच ३१-सीएम ५६३२ क्रमांकाच्या इंडिका कारने कुरखेडावरुन देसाईगंजकडे येत होते. देसाईगंजनजीकच्या वनविभागाच्या कार्यालयाजवळ पोहचताच कारमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ कार थांबविली आणि दोघेही जण कारमधून बाहेर उतरले. एवढ्यात कारने पेट घेतला आणि काही क्षणातच आगडोंब उसळला. त्यानंतर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत कार बरीच जळाली होती.आमदार क्रिष्णा गजबे, उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, पोलिस निरीक्षक मांडवकर, सहायक पोलिस निरीक्षक अतुल तवाडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शॉर्ट सर्किटमुळे कार जळाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धावत्या कारने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:27 AM
धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ घडली.
ठळक मुद्देदेसाईगंजजवळील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली