शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विद्यार्थ्यांचे बँक खातेक्रमांक गोळा करण्याची लगबग

By admin | Published: April 21, 2017 1:09 AM

प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ४०० रूपये अनुदान देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. अनुदानाची रक्कम

शिक्षण विभाग लागला कामाला : गणवेशासाठी खाते आवश्यक गडचिरोली : प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ४०० रूपये अनुदान देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाचे कर्मचारी व शिक्षक विद्यार्थ्यांचे बँक खाते गोळा करीत आहेत. आजपर्यंत शिक्षण विभाग वस्तू खरेदी करून सदर वस्तू संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत होता. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते. त्याचबरोबर वस्तूचा दर्जाही अत्यंत खालावलेला राहत होता. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने अनुदानाची रक्कम सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण यावर्षीपासून अवलंबिले आहे. या योजनेत सुरूवातीला पाठ्यपुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांचे बँक खाते वेळेवर गोळा न झाल्यास विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहण्याचा धोका होता. पहिल्या दिवशी पुस्तक न मिळाल्यास शासनावर मोठ्या प्रमाणात टिका होण्याची शक्यता असल्याने शासनाने सदर निर्णय मागे घेतला. त्यानंतर थेट अनुदानाची योजना गणवेशासाठी लागू केली. गणवेशही शाळेच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध व्हावे, असा शासनाचा हेतू आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. सुट्या लागण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक गोळा करण्यास सांगण्यात आले आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी सहजासहजी शाळेत येत नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचे बँक खाते गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बँक खाते काढण्यास सांगितले जात आहे. १ मे पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते काढून ते शिक्षण विभागाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)