कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : खरीप हंगाम जवळ आला असल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे सुरू केली आहे. शेत जमीन स्वच्छ करणे, काटेरी झुडूपे तोडणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, खत टाकणे आदी कामे सुरू आहेत. सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात सकाळच्या सुमारास शेतावर शेतकरी व शेतमजुरांची कामासाठी लगबग दिसून येत आहे.सिरोंचा तालुक्यात प्रामुख्याने धान, कापूस व मिरची पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामात या भागातील शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. आता जून महिना सुरू झाला असून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व कामाला जोमाने भिडला आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे शेतकरी काही दिवस संकटात सापडला होता. संचारबंदीमुळे शेतकºयांना तालुका मुख्यालयी जाऊन कामे करणे शक्य झाले नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत शिथीलता आणल्याने या भागातील शेतकºयांनी कर्जविषयक कामाला गती दिली. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत जाऊन पीक कर्ज उचलण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. गतवर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाने हवी तशी साथ दिली नाही. परिणामी शेतकºयांना नुकसान सोसावे लागले. रबी हंगामातही रोगाने कहर केला. त्यानंतर कोरोनारूपी संकट आले. याचा परिणाम कृषी क्षेत्रातील कामांवर झाला. मात्र आता गेल्या तीन-चार दिवसापासून पाऊस बरसत असल्याने शेतकरी नव्या जोमाने पुन्हा शेती मशागतीच्या कामाला भिडला आहे.युवक वर्गाचेही मिळताहे सहकार्यसिरोंचा तालुक्यातील बहुतांश कुटुंब शेती व्यवसाय करतात. या भागात नदी, नाल्यांची संख्या मोठी असून बºयापैकी सिंचन सुविधा आहे. काही शेतकरी कापूस, मिरची व भाजीपाला पीक घेतात. खरीप हंगामात होणाºया पीक लागवडीसाठी शेतकºयांनी पेरणीपूर्व कामे सुरू केली आहे. या कामात शेतकºयाच्या कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारे युवक-युवतीचेही सहकार्य मिळत आहे. आई-वडिलांसोबत शेतावर जाऊन युवक, युवती छोटीमोठी कामे करीत असल्याचे दिसून येत आहे.
पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM
सिरोंचा तालुक्यात प्रामुख्याने धान, कापूस व मिरची पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामात या भागातील शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. आता जून महिना सुरू झाला असून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व कामाला जोमाने भिडला आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे शेतकरी काही दिवस संकटात सापडला होता. संचारबंदीमुळे शेतकºयांना तालुका मुख्यालयी जाऊन कामे करणे शक्य झाले नाही.
ठळक मुद्देलगबग वाढली; सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची वाढली लगबग