प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठवितात. त्या प्रस्तावांत संबंधित विमा कंपनीकडून विविध त्रुटी काढून त्याची पूर्तता करण्यास सांगितले जाते. जुने फेरफार, तलाठ्याकडील कागदपत्रे, पोलीस ठाण्यातील रिपोर्ट, शवपरीक्षण अहवाल अशा अनेक बाबींसह वारसाधारकांकडील कागदपत्रेही सादर करावी लागतात. यातील कोणताही कागद नसेल तर प्रस्ताव थांबविला जातो.
(बॉक्स)
कोणाला किती मिळते मदत?
शेतकऱ्याचा विविध कारणाने आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून विमा कंपनीमार्फत २ लाखांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय कायम अपंगत्व (४० टक्के) आल्यास १ लाखाची मदत मिळते. सातबाराधारक प्रत्येक शेतकरी यासाठी पात्र असतो. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किंवा इतर कोणत्याही अटी नाहीत. १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यूसाठी त्यांच्या कुटुंबियांना योजनेचा लाभ दिला जातो.
(कोट)
... म्हणून प्रस्ताव प्रलंबित आहेत
या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत विमा दाव्याचा प्रस्ताव सादर करणे गरजेचे असते. त्यामुळे जेवढे कागदपत्र उपलब्ध होतील त्यावरून प्रस्ताव सादर केला जातो. त्रुटींची पूर्तता मागाहून केली जाते. आता नागपूर येथे विभागीय सहसंचालकांकडे दर आठवड्याला याबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे प्रस्ताव लवकर मंजूर होण्याची शक्यता आहे.
- जी.बी.बादाडे
तंत्र अधिकारी, कृषी विभाग, गडचिरोली
रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक मृत्यू
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूमागे अनेक कारणे असली तरी त्यात सर्वाधिक मृत्यू हे रस्त्यावरील अपघातात झालेले आहेत. त्यामुळे दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे.
- तसेच सर्पदंश आणि पाण्यात बुडून मरण पावणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतातून येताना नदी-नाले ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहून जाऊन दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो.