लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : बाहेर गावातून येणाऱ्या चारचाकी व दुचाकीचाकी वाहनांवर फवारणी करण्यासाठी भामरागड प्रवेशद्वाराजवळ फवारणी टीम तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक वाहन थांबवुन त्याच्यावर निर्जंतुक करणाºया द्रव्यांची फवारणी केल्यानंतरच वाहनांना भामरागड शहरात प्रवेश दिला जात असल्याचे चित्र बुधवारी दिसून येत होते.भामरागडात दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार दोन आठवड्यांपासुन बंद असला तरी, या बुधवारी बाजार भरेल या आशेने ग्रामीण भागातील अनेक नागरिक भामरागड येथे भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येण्यास सुरूवात झाली. तसेच आलापल्ली व इतर ठिकाणावरून भाजीपाल्याने भरलले मालवाहू वाहनेही येत होती. दुसऱ्या गावातून येणाऱ्या वाहनामुळे भामरागडात संसर्ग होण्याची भीती लक्षात घेऊन नगर पंचायतीने फवारणी टिम तयार केली. भामरागडात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनावर फवारणी केली जात होती. त्यानंतरच प्रवेश दिला जात होता. आरोग्य तपासणी करण्याचा सल्लाही दिला जात होता. बँक, एटीएम, पोस्ट, तहसील, दवाखाने आदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा फवारणी केली जात आहे.
निर्जंतुकीकरणानंतरच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 5:00 AM
भामरागडात दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार दोन आठवड्यांपासुन बंद असला तरी, या बुधवारी बाजार भरेल या आशेने ग्रामीण भागातील अनेक नागरिक भामरागड येथे भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येण्यास सुरूवात झाली. तसेच आलापल्ली व इतर ठिकाणावरून भाजीपाल्याने भरलले मालवाहू वाहनेही येत होती.
ठळक मुद्देभामरागड न.पं.चा उपक्रम : सार्वजनिक स्थळी फवारणी