लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विविध उपाययोजना करून सेवा दिली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील आणि छत्तीसगड सीमेवरील कोरची तालुक्यातील स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी गुरूवारी (दि.२३) कोरची ग्रामीण रूग्णालयात आकस्मिक भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाचा आढावा घेताना त्यांनी रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.जिल्हाधिकारी सिंगला यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयात भेट देऊन शासकीय आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात सुरू असलेल्या इमारत बांधकामाची माहिती उपस्थित मजूर व कामगारांकडून जाणून घेतली. त्यानंतर ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन आरोग्य विभागाचा संपूर्ण आढावा घेतला. प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन आरोग्य व्यवस्थेचे काम पाहिले. कोरोना आयसोलेशन वॉर्डाचीही पाहणी केली. डॉक्टरांनी नेहमीच सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.ग्रामीण रूग्णालयाच्या सेवेत ढिसाळ कारभार दिसून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.कोरोनाबाबत नागपूर जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीला १४ व्या वित्त आयोगामधील २५ टक्के निधी ग्रा.पं.स्तरावरील कर्मचाºयांसाठी मास्क व सॅनिटायझरसाठी खर्च करण्याचे आदेश गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांना देण्यात आले होते. पण त्यांनी सदर वस्तू वितरित न केल्याचे आढावा बैठकीत समोर आले. रूग्णवाहिकेतील वाहनचालकांना मास्क व हँडग्लोज देण्यात येतात. याबाबत योजनाही आहे,अशी माहिती डॉ. विजय राठोड यांनी दिली.सदर बैठकीला तहसीलदार छगनलाल भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी, बीडीओ देविदास देवरे, विस्तार अधिकारी राजेश फाये, नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये, प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.तेंदू कंत्राटदारांना प्रवेशाची मुभा- जिल्हाधिकारीरोजगाराच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा तेंदू संकलन हंगाम कोरोनाच्या संचारबंदीमुळे अडचणीत आला आहे. तेंदू घटकाची लिलाव प्रक्रियाही थंडबस्त्यात आहे. मार्च महिन्यामध्ये ही लिलाव प्रक्रिया दरवर्षी पूर्ण होत असते. गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटदार या प्रक्रियेत सहभागी होत असतात. मात्र यंदा अडचण आहे. ही बाब तेथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर गोंदिया जिल्ह्यातील तेंदू कंत्राटदारांना गडचिरोली जिल्ह्यात येण्याची मुभा दिली जाईल. तसेच तेंदूपत्ता हंगाम सुरळीत पार पडेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिंगला यांनी यावेळी दिले. ११ वर्षांपासून तहसील कार्यालयात असलेली बँक आॅफ इंडियाची शाखा गावापासून २ किमी अंतरावर असल्याने ग्राहकांना त्रास होत असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. ही बँक शाखा गावात स्थलांतरीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.डॉ.कवाडकर यांना मुख्यालयी प्रतिनियुक्तीकोरची ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन कवाडकर यांची कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात आवश्यकता नसल्याच्या कारणावरून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.
जिल्हाधिकाऱ्यांची कोरचीत आकस्मिक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:00 AM
जिल्हाधिकारी सिंगला यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयात भेट देऊन शासकीय आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात सुरू असलेल्या इमारत बांधकामाची माहिती उपस्थित मजूर व कामगारांकडून जाणून घेतली. त्यानंतर ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन आरोग्य विभागाचा संपूर्ण आढावा घेतला. प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन आरोग्य व्यवस्थेचे काम पाहिले.
ठळक मुद्देकारभाराबाबत नाराजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रूग्णालयात घेतला आढावा