बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू : प्रशासकीय कामकाज प्रभावी गडचिरोली : जिल्हा सेवा वर्ग ३ (लेखा) श्रेणी १ मध्ये असलेल्या सहाय्यक लेखाधिकारी या पदाला राजपत्रित दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेअंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत लेखनीबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयातील प्रशासकीय कामकाज मंदावले आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या नेतृत्वात सदर लेखनीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोत्तावार, कार्याध्यक्ष धनराज सहारे, उपाध्यक्ष संजीवशहा मेश्राम, बलराज जुमनाके, एन. एन. हकीम यांच्यासह सुमारे १०३ कर्मचारी सहभागी झाले आहे. पंचायत समितीस्तरावरही लेखा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनात जिल्ह्यातील एकूण १०३ कर्मचारी सहभागी झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील निकालाचे काटेकोरपणे पालन करून जीआर काढावा, कोर्टाच्या आदेशानुसार सहायक लेखाधिकाऱ्यांचे ग्रेड पे मंजूर करावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
लेखा कर्मचारी आंदोलनावर
By admin | Published: March 16, 2017 1:14 AM