लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी येथे क्रीडा संकूल, बसस्थानक, बसडेपो आदी मंजूर विकासकामे कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची अधिग्रहण कार्यवाही होत नसल्याने चामोर्शी शहरातील कोट्यवधीची विकासकामे थंडबस्त्यात आहेत.सदर विकासकामांना शासकीय जागाच उपलब्ध नाही, अशी निरर्थक कारणे प्रशासन व शासनाच्या वतीने सांगितली जात होती. मध्यंतरीच्या काळात बसस्थानक व बसडेपोसाठी खासगी मालकीची जागा विकत घेण्याचा घाट घातल्या गेला होता. परंतु ‘त्या’ प्रक्रियेला विलंब झाल्याने काही कास्तकारांनी आपली जागा विकून टाकली. मार्च २०१७ मध्ये क्रीडा संकूलसाठी क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत आष्टी मार्गावरील सर्वे क्रमांक १४४२/१ मधील एकूण ८.२८ आर हेक्टरपैकी तीन एकर जागेची मोजणी करण्यात आली. सदर जमिनीचे सीमांकन करून शासनाकडून जागा अधिग्रहीत केली. परंतु क्रीडा संकुलाच्या बांधकामाला अद्यापही मुहूर्त सापडला नाही. तेथेच अद्यापही ५.२८ हेक्टर आर. जागा शिल्लक आहे. याशिवाय चामोर्शी-मूल मार्गावर बिनकामाची शासकीय बोडी असून तेथे सात एकरपेक्षा अधिक जागा आहे. या जागेची पाहणी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली होती.नियोजित क्रीडा संकुलाच्या उर्वरित जागेवर बस डेपो उभारल्यास नागरिकांना सोयीचे होईल. चामोर्शी-मूल मार्गावरील निरूपयोगी बोडी ताब्यात घेऊन येथे बसस्थानक व बस डेपोची निर्मिती केल्यास सदर शासकीय जागेचा सदुपयोग होऊन चामोर्शी शहराचे सौंदर्यीकरण वाढू शकते. दोन ठिकाणापैकी कुठेही सदर विकासकामे व्हावी, अशी मागणी जनतेची आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली व जनतेच्या दृष्टीकोणातून अत्यावश्यक असलेली विकासकामे जनतेच्या सोयीसुविधानुसारच योग्य ठिकाणी व्हावी, अशी जनभावना आहे.नागभीडच्या निरर्थक बसस्थानकाची पुनरावृत्ती होऊ नयेआष्टी मार्गावर शासकीय जमीन आहे. तसेच चामोर्शी-मूल मार्गावर शासकीय बोडी असून येथे ६० एकरपेक्षा अधिक शासकीय जागा आहे. या दोन्ही जागा विकासकामांसाठी अतिशय उपयुक्त असून सहज उपलब्ध होणाºया आहेत. असे असताना सुध्दा आडवळणाची खासगी जागा विकत घेण्याचा घाट रचला जात आहे. त्यामुळे नागभिडसारख्या निरर्थक बसस्थानकासारखी स्थिती व पुनर्रावृत्ती चामोर्शी येथे होऊ नये, अशी येथील नागरिकांची भावना आहे.ग्रामीण भागातही विकासाच्या नावाने बोंबचामोर्शी शहरातील महत्वपूर्ण विकासकामे रखडलेली तर आहेतच, अशीच परिस्थिती तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. अनेक दुर्गम गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाही. सिंचन सुविधा, पाणी योजना, शासकीय कार्यालयात पदे रिक्त आदी समस्या कायम आहेत.
चामोर्शीतील विकासकामांना मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 11:54 PM
चामोर्शी येथे क्रीडा संकूल, बसस्थानक, बसडेपो आदी मंजूर विकासकामे कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची अधिग्रहण कार्यवाही होत नसल्याने चामोर्शी शहरातील कोट्यवधीची विकासकामे थंडबस्त्यात आहेत.
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : शासकीय जमीन अधिग्रहित करून कामे मार्गी लावा