१८ हजार ५०० चा दंड वसूल : पोलिसांची धडक मोहीम सुरू कुरखेडा : विना परवाना, अल्पवयीन व सुसाट वेगात वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाविरोधात कुरखेडा पोलिसांनी गुरूवारी बायपास मार्गावर नाकेबंदी करीत कारवाई सुरू केली आहे. ९३ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १८ हजार ५०० रूपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला आहे. कुरखेडाचे ठाणेदार योगेश घारे, पोलीस हवालदार नरेंद्र बांबोळे, केशव दादगाये, वसंत जौंजाळकर, संजय मेश्राम, अरूण पारधी, जयचंद गेडाम, रमेश तेलामी, निरंजन जाधव, कल्पना तुलावी, संगीता चव्हाण यांनी केली. कुरखेडा शहरात तसेच सभोवतालच्या परिसरात सुसाट वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताचाही धोका बळावला आहे. ही बाब लक्षात घेऊन कुरखेडा पोलिसांनी मागील चार दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची मोहीम नियमितपणे राबवावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेडात ९३ वाहनांवर कारवाई
By admin | Published: April 15, 2017 1:31 AM