शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

चोरीची वीज घ्याल तर कारवाई अटळ; प्रशासकीय यंत्रणेचा गणेश मंडळांवर 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 12:19 PM

Gadchiroli : डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळाच नाहीतर कारवाईला तयार राहा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गणेश उत्सवांसाठी मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत असणे आवश्यक आहे. मात्र, खर्च वाचविण्याच्या नादात काही मंडळांचे पदाधिकारी चोरीची वीज वापरतात. याबाबत महावितरणने यंदा कठोर धोरण अवलंबिले आहे. तसेच डीजेच्या आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या मंडळांवर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाय योजना कराव्यात व वीजपुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी असे, आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग महावितरणच्या अखत्यारितील सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजपुरवठ्याच्या दराने वीज देणार आहे. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी संपर्क साधावा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे. 

खबरदारी पाळा, वीज अपघात टाळा सार्वजनिक गणेश मंडळांनी रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्याच्या परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना सणांचा आनंद घेता यावा यासाठी खबरदारी बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोठ्या आवाजाने कानाला धोकातशी तर डीजे वाजवायला परवानगीच नाहीः परंतु काही अटी व शर्तीवर ५० ते ७० डेसिबलपर्यंत डीजे वाजवायला परवानगी आहे. ७० डेसिबलपर्यंतचा आवाज हा कानासाठी सहनशील आहे. मात्र, त्यापेक्षा थोडातरी आवाज वाढला तर कानाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे डीजेचा वापर टाळावा.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीGanesh Mahotsavगणेशोत्सव