लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संवर्ग १ व संवर्ग २ मधून ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची आता चौकशी केली जाणार आहे. खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी हे. सू. पाठक यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक २ जून रोजी काढण्यात आले आहे. यामुळे खोटी माहिती सादर करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविताना संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये मोडणाºया शिक्षकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. संवर्ग १ मध्ये अपंग कर्मचारी, हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, मूत्रपिंड रोपण केलेले, कॅन्सरग्रस्त, विधवा परितक्त्या व वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांचा समावेश होतो. तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गतच्या शिक्षकांचा समावेश होता. बदलीच्या पोर्टलमध्ये केवळ माहिती दर्शवायची होती. त्यासोबतचे प्रमाणपत्र अपलोड करायचे नव्हते. याचा गैरफायदा काही शिक्षकांनी घेत संवर्ग १ व २ मधून बदल्या करून घेतल्या. या संवर्गाच्या शिक्षकांना मोक्याच्या व चांगल्या शाळा मिळाल्या. याचा परिणाम संवर्ग ३ व ४ मध्ये मोडणाºयांवर झाला आहे. बदली यादी प्रसिध्द होताच शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली. १० ते १५ वर्ष दुर्गम भागात सेवा करणाºया शिक्षकांचीही बदली झाली नाही. तर काही शिक्षकांना पुन्हा दुर्गम भागातच पाठविण्यात आले. याबाबतच्या हजारो तक्रारी राज्यभरातील शिक्षकांकडून पुणे येथील एनआयसी विभागाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या कक्ष अधिकाºयांनी २ जून रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता शिक्षकांनी पोर्टलमध्ये भरलेल्या माहितीनुसार कागदपत्रे मागविली जाणार आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत प्रमाणपत्रांची तपासणी केली नाही. सदर प्रक्रिया लवकर राबवावी. बोगस प्रमाणपत्र जोडणाºया शिक्षकांवर कारवाई करून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली आहे. कक्ष अधिकाऱ्यांच्या परिपत्रकानंतर गडचिरोली जिल्हा परिषद कोणती कार्यवाही करते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.परिपत्रकात शिक्षकांचे कान टोचलेपरिपत्रकात संबंधित शिक्षकांनी अर्ज भरताना ज्या संवर्गासाठी अर्ज केला आहे, त्या संबंधित कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध असतील, असे गृहित धरून बदल्या केल्या. जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना ते देशासाठी नितीमान व संस्कारीत पिढी घडवितात. सर्व पालकांचा देखील शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्याच प्रकारचा असणार आहे. यास्तव सर्व शिक्षकांची वर्तणूक प्रशासनाप्रती सत्यतेची असणे अपेक्षीत आहे. म्हणूनच शिक्षकांनी जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत अर्ज सादर करताना या अर्जामध्ये बनावट माहिती दर्शवून बदल्या करून घेतल्या असतील तर अशा शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत या पत्रान्वये सूचना देण्यात येत आहेत. अशा शिक्षकांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.कोर्टात जाण्याची तयारी सुरूग्राम विकास विभागाने बदल्यांची यादी जाहीर केली आहे. या बदली यादी विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी अन्यायग्रस्त शिक्षकांनी सुरू केली आहे. याचिका दाखल झाल्यास बदली प्रक्रिया आणखी किचकट होण्याची शक्यता आहे.
बदलीसाठी खोटी माहिती भरणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:54 PM
संवर्ग १ व संवर्ग २ मधून ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची आता चौकशी केली जाणार आहे. खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी हे. सू. पाठक यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक २ जून रोजी काढण्यात आले आहे. यामुळे खोटी माहिती सादर करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.
ठळक मुद्देशिक्षक बदली प्रक्रिया : कक्ष अधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक