लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मराठा समाजाची आकडेवारी घोषित करताना शासनाने कुणबी व मराठ्यांना एकत्र करून आकडेवारी जाहीर केली होती. मात्र सरकारने कुणबी समाजाला आरक्षण दिले नाही. कुणबी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम व युवा नेते डॉ.नितीन कोडवते उपस्थित होते.आरक्षणासाठी मराठ्यांनी काढलेल्या आंदोलनात कुणबी समाजबांधवांनी सहकार्य केले. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना सरकारने कुणबी समाजाचा विचार केला नाही. राणे समितीने गडचिरोली जिल्ह्यात मराठ्यांची लोकसंख्या १८ हजार तर चंद्रपूर जिल्ह्यात ५४ हजार लोकसंख्या दाखविली. लोकसंख्येने ४४ टक्के असलेल्या ओबीसींना गडचिरोली जिल्ह्यात केवळ सहा टक्के आरक्षण आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणात कुणबी समाजाला वगळले. सरकारची ही भूमिका अन्यायकारक आहे, असेही आ.वडेट्टीवार यावेळी म्हणाले. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात मराठ्यांची लोकसंख्या नगण्य आहे. असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले.विद्यमान सरकारने कुणबी समाजावर अन्याय करू नये, हा अन्याय दूर करण्यासाठी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कुणबी समाजाच्या आरक्षणाचा हा विषय आपण आगामी अधिवेशनात लावून धरू, असे आ.वडेट्टीवार यांनी सांगितले.अधिकार व हक्कासाठी २७ डिसेंबर रोजी गडचिरोलीत आयोजित करण्यात आलेल्या कुणबी समाजाच्या महामोर्चाला आपला संपूर्ण पाठिंबा आहे, असे आ.वडेट्टीवार यांनी जाहीर केले.
मराठ्यांच्या १६ टक्के आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 9:57 PM
मराठा समाजाची आकडेवारी घोषित करताना शासनाने कुणबी व मराठ्यांना एकत्र करून आकडेवारी जाहीर केली होती. मात्र सरकारने कुणबी समाजाला आरक्षण दिले नाही. कुणबी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम व युवा नेते डॉ.नितीन कोडवते उपस्थित होते.
ठळक मुद्देवडेट्टीवार यांची मागणी : कुणबी महामोर्चाला पाठिंबा जाहीर