लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट असतानाही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांची भर पडली आहे. महावितरणमार्फत या ग्राहकांना वीज जाेडणी देण्यात आली आहे. उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. काही संयुक्त कुटुंब विभक्त हाेऊन स्वतंत्र मीटरची मागणी करतात. त्यामुळे घरगुती वापरासाठी वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच गावखेड्यातही किराणा दुकान व इतर दुकाने थाटली जातात. यासाठीसुध्दा स्वतंत्र वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वीज जाेडणीची मागणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वीज जाेडणी उपलब्ध करून देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत महावितरणने काेराेनाच्या संकटातही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांना जाेडण्या दिल्या आहेत. महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा राहते. त्यामुळे मार्च महिन्यात अर्ज केलेल्या अनेक ग्राहकांना अजूनपर्यंत वीज जाेडणी मिळाली नाही.
वीज जाेडणी देण्याची प्रक्रिया ऑनलाईनमागणीच्या तुलनेत वीज मीटरचा महावितरणकडे नेहमीच तुटवडा राहते. काही ग्राहकांना एक ते दाेन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज मीटर मिळत नसल्याने वीज जाेडणी हाेत नाही. त्यामुळे वीज जाेडणी देताना गैरव्यवहार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी महावितरणने वीज मीटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देत वीज मीटर उपलब्ध करून वीज जाेडणी दिली जाते. तसेच अर्ज केल्यापासून मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती लक्षात येण्यास वीज ग्राहकांना मदत हाेते.
छत्तीसगड सीमेलगतच्या पाच टक्के गावांना विजेची प्रतीक्षा
गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के गावापर्यंत वीज पाेहाेचली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली ५ टक्के गावे मात्र अजूनही विजेपासून वंचित आहेत. एटापल्ली, भामरागड तालुक्यातील काही गावे अतिशय दुर्गम भागात व घनदाट जंगलात वसली आहेत. काही गावांना डाेंगरांचा वेढा आहे. या गावांमध्ये वीज खांब नेणे कठीण आहे, अशी ५ टक्के गावे विजेपासून वंचित आहेत.
काही गावांना साैरऊर्जेवरील संयंत्र पुरविण्यात आली आहेत. मात्र हे संयंत्र काही दिवसातच बंद पडत असल्याने तेथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या गावांपर्यंत वीज पाेहाेचविण्याचे आव्हान महावितरणसमाेर आहे.