शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

मार्कंडादेव यात्रेत व्यसनमुक्तीचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:48 AM

महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डा येथे झालेली यात्रा यंदाही दारू व तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न मुक्तीपथच्या वतीने करण्यात आला.

ठळक मुद्देचोरट्या मार्गाने भागविली तलफ : तंबाखूजन्य पदार्थ, दारूच्या बाटल्यांची काढली अंत्ययात्रा

ऑनलाईन लोकमतमार्कंडा : महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डा येथे झालेली यात्रा यंदाही दारू व तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न मुक्तीपथच्या वतीने करण्यात आला. त्यासाठी प्रशासनानेही बºयापैकी सहकार्य केले. मात्र खर्रा व तंबाखूप्रेमी यात्रेतच चोरट्या मार्गाने तर मद्यप्रेमी लोक नदीतिरापलिकडील साखरी घाटावर (जिल्हा चंद्रपूर) जाऊन नशापूर्ती करून येत असल्याचे दिसून आले.ज्येष्ठ सामाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखुमुक्त करण्यासाठी २०१६ पासून मुक्तिपथ अभियान सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सार्वजनिक उत्सव, ठिकाणे दारू व तंबाखुमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत मार्कंडाची यात्रा गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नशामुक्त करण्याचा प्रयत्न झाला. पण यात्रेत सापडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, खºर्याच्या रिकाम्या पन्न्या, तंबाखूची रिकामी पाकिटे पाहिल्यानंतर नागरिकांवर नशामुक्तीचा प्रभाव झालाच नसल्याचे दिसून येत होते. मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्यातून व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले. याशिवाय यात्रेत जमा झालेले तंबाखुजन्य पदार्थ, दारूच्या बाटल्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व शेवटी त्याची होळी करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वर रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक कांबळे, मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.बाहेरगावाहून आलेले काही विद्यार्थीही यात सहभागी झाले होते. दक्षिणेची काशी समजल्या जाणाºया मार्कंडादेव यात्रेमध्ये नशामुक्तीबद्दल जनजागृती केल्याने लोकांच्या समजुतीमध्ये व व्यवहारामध्ये बदल घडेल, असा विश्वास या अभियानाबद्दल डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केला.यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्याची कल्पना गेल्यावर्षी मुक्तिपथतर्फेमांडण्यात आली होती. याला मार्कंडा मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले. यात्रेदरम्यान कोणालाही खर्रा व तंबाखूची विक्र ी न करण्याच्या अटीवर दुकानांसाठी जागा देण्यात आली. स्थानिक पानठेलेधारकांनीही या काळात आपली दुकाने बंद ठेवली असली तरी चोरट्या मार्गाने काही लोकांकडून विक्री सुरूच होती. मंदिर परिसरात कोणीही खर्रा तंबाखूचे सेवन करू नये यासाठी प्रवेशद्वारावर भाविकांना त्यांच्याजवळील खर्रा, तंबाखू, बिडी, सिगरेटची पाकिटे एका पेटीत टाकण्याचे आवाहन मुक्तिपथच्या स्वयंसेवकांनी केले. सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनीही या उपक्रमाला काही प्रमाणात का होईना, सहकार्य केले.