लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच निवडणूक बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दोन हेलिकॉप्टर कार्यरत राहणार असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरिक्षक राजकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.यावेळी सीआरपीएफचे उपमहानिरिक्षक मानस रंजन, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी अधिकारी उपस्थित होते. निवडणूक काळात गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांची सी-६० तुकडी, सीआरपीएफ जवान, बीएसएफ व आरपीएफचे जवान तैनात राहणार आहेत. गडचिरोली पोलीस दलाकडे एक हेलिकॉप्टर आहे. मात्र आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास वेळेवर मदत मिळावी, यासाठी एक अतिरिक्त हेलिकॉप्टर शासनाकडून मागविले जाणार आहे. नक्षल्यांच्या कोणत्याही भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली जाणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन राजकुमार यांनी केले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर सुरक्षितरित्या पोहोचविण्याचे पोलीस विभागासमोर आव्हान आहे. हे आव्हान यशस्वीरित्या स्वीकारले जाईल. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन पूर्ण आहे, अशी माहिती बलकवडे यांनी दिली.
निवडणूक बंदोबस्तासाठी मिळणार अतिरिक्त हेलिकॉप्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:20 AM
पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच निवडणूक बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दोन हेलिकॉप्टर कार्यरत राहणार असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरिक्षक राजकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
ठळक मुद्देस्पेशल फोर्स राहणार तैनात : सीआरपीएफ महानिरीक्षकांची माहिती