लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासींचे धर्मगुरू पहांदीपारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत माणून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी, परंपरा, भाषा टिकवून मुलाची भूमिका बजाविली. आदिवासी धर्म जागृतीसाठी त्यांनी काम केले. त्यामुळे आदिवासी युवकांनी प्राचीन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी कोयापुनेमचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.मुत्तापूर येथे जागतिक गोंड सगा मांदी कुपारलिंगो सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोटुल भूमीत कोयापुनेमता सल्लागांगरा व येलु रंगता झेंडा उपसना पंडूम तथा समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रेलानृत्य व आदिवासी महापुरूषांचा जयघोष करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. सुंदर नैताम, अध्यक्षस्थानी गोंडी धर्मप्रचारक सुमन मेश्राम, ध्वजारोहक म्हणून जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, मार्गदर्शक म्हणून कमलापूरचे माजी सरपंच सांबया करपेत, विद्यार्थी प्रतिनिधी कैैलास कोरेत, महेश मडावी, दिवाकर वेलादी, नीलेश सोयाम, माजी सरपंच मधुकर वेलादी, नामदेव आत्राम, माजी सरपंच मधुकर आत्राम, वासुदेव मडावी, तुकाराम सडमेक, शंकर आत्राम, सविश आत्राम उपस्थित होते.गोटूल भूमीत सल्लागांगरा प्रतिष्ठापना व सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक गोंडी धर्म प्रचारक सत्यनारायण कोडापे, संचालन व आभार प्रकाश वेलादी यांनी मानले. यशस्वीतेसाठी आदिवासी बांधवांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आदिवासींनी प्राचीन संस्कृती टिकवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:37 AM
आदिवासींचे धर्मगुरू पहांदीपारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत माणून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी, परंपरा, भाषा टिकवून मुलाची भूमिका बजाविली. आदिवासी धर्म जागृतीसाठी त्यांनी काम केले.
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : मुत्तापूर येथे कोयापुनेम व सल्लागांगरा शक्तीचे अनावरण