निवडणुकीची तयारी : महागाव परिसरातील नागरिकांचा समावेशअहेरी : महागाव परिसरातील विविध पक्षांच्या ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी महागाव येथे रविवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान आदिवासी विद्यार्थी संघामध्ये प्रवेश घेतला. सर्व कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आविसंमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये महागाव येथील माजी सरपंच मधुकर आत्राम, धर्माजी गेडाम, मल्लेश पंदरम, विठोबा बोरूले, सुनील आयडुल, श्रीकांत वाढई, दशरथ गेडाम, योगिता गावडे, प्रभाकर पंधराम, मधुकर बोरूले, सखाराम कुसराम, अक्षय बोरूले, सचिन कुसराम, अंजना आईदूल, पोच्चा गेडाम, वंदना बोरूले, मथुना वेलादी, माया कुसराम, मयुरी सिडाम, पुष्पा गेडाम, नमिता गेडाम, शंकर बोरूले, राजप्पा पंधराम, थिमानी आईदूल, पत्रू सिडाम, संगीता पंधराम, गणेश सडमेक, कांता पंधराम, कमला आईदूल, ममता आत्राम, रोज सिडाम, योगीता आईदूल, गणपत वाढई, किशोर वाढई, रमेश सिडाम आदींचा समावेश आहे. आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन ग्रामीण व दुर्गम भागात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. माजी आ. दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, नाग विदर्भ आंदोलन समिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आदिवासी विद्यार्थी संघामध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाची स्थिती मजबूत होत चालली असल्याची माहिती अजय कंकडालवार यांनी दिली आहे. आविसंच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. महागाव परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ व मी स्वत: सातत्त्याने पाठपुरावा करीत आहे, अशी माहिती सभापती अजय कंकडालवार यांनी नवप्रवेशितांना दिली. (शहर प्रतिनिधी)
५० जणांचा आविसंमध्ये प्रवेश
By admin | Published: October 10, 2016 12:58 AM