गडचिराेली : आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी ७ एप्रिल राेजी साेडत काढण्यात आली हाेती. ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना ११ जून ते पुढील २० दिवसांपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे, असे गडचिराेली गटसाधन केंद्राच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी कळविले आहे.
७ एप्रिल राेजी प्रवेशाची साेडत काढण्यात आली हाेती. मात्र काेराेनाची साथ वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली हाेती. पुन्हा ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची पहिलीच्या प्रवेशाकरिता निवड झाली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवड झालेल्या शाळेत कागदपत्रे सादर करावीत. शाळास्तरावरून त्यांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. त्यानंतर गटस्तरावरील समिती या कागदपत्रांची तपासणी करेल. गटस्तरावर तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण हाेईल. विहित मुदतीत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी केले आहे.