शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

आरमोरीत आॅनलाईन मटका जोरात

By admin | Published: March 29, 2017 2:11 AM

आरमोरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये सध्या आॅनलाईन मटका जोरात सुरू झाला आहे.

विद्यार्थी तरूण पैसे लावण्यात गुंतले जोगीसाखरा : आरमोरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये सध्या आॅनलाईन मटका जोरात सुरू झाला आहे. आरमोरी पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यामध्ये आरमोरी शहरासह ग्रामीण भागात सट्ट्या प्रमाणेच आॅनलाईन मटका बाजार मोठ्या प्रमाणावर तेजीत आहे. विविध चौकांमध्ये आॅनलाईन मटका व्यवसाय थाटल्या गेला असून तरूण व युवक वर्ग तसेच शालेय विद्यार्थी कमी पैशात जास्त पैसे मिळतील म्हणून दिवसभर येथे मटका खेळत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात आॅनलाईन मटका दुकानांची संख्या वाढल्याने नागरिकांचा मोठा पैसा यात दररोज जात असल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागात या आॅनलाईन लॉटरीमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. अनेकदा याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. परंतु पोलीस पोहोचण्याच्या आतच बाजाराचा दरवाजा बंद करून अवैध व्यावसायिक पसार होतो. असे दिसून येते. या मागे हप्ते वसुली हे सगळ्यात मोठे कारण आहे. पोलिसांची कारवाईच गोपनिय राहत नाही. त्यामुळे आरमोरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आॅनलाईन मटका सुरू झाला आहे. हा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी या भागातील महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.