लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्याने येथे सरपंच व सदस्य आरूढ झाले आहेत.मे महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी गावातील लोकांना मार्गदर्शन व जागृती करून कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे नामनिर्देशनपत्र भरण्याचे आवाहन केले होते. सोबतच जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील नागरिकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्स्फूर्तपणे नामनिर्देशन पत्र भरले. एकूण सात सदस्यांपैकी चार सदस्य व एकाने सरपंचपदासाठी नामनिर्देशन पत्र भरला होता. सरपंच म्हणून कवलसिंग देवलसिंग राणा, सदस्य म्हणून खडूहा तरनसाय तुळशिराम, फरदीया उर्मिला भुकूराम, ताराम जयराम भुकूराम व फरदीया ललतुराम नारायण हे अविरोध निवडून आले. १२ वर्षानंतर हिरंगे ग्रामपंचायत गठित झाली असून प्रशासनाला यश मिळाले आहे, असे मत तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी व्यक्त केले.सरपंच व सदस्यांना प्रमाणपत्राचे वितरण तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी.एस. नैताम, डी.आर. भगत, बी.एम. वाकुकुडकर, नगरसेवक समीर कुरेशी, अर्चना दुधबावरे उपस्थित होते.
१२ वर्षानंतर हिरंगे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी आरूढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:12 AM
तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्याने येथे सरपंच व सदस्य आरूढ झाले आहेत.
ठळक मुद्देप्रमाणपत्र वाटप : नामनिर्देशनाअभावी निवडणूक झालीच नाही