शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

३० तासानंतर संपले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:39 PM

ट्रक आणि एसटी बसच्या धडकेत चार जणांनी जीव गमविल्यानंतर बुधवारी येथे सुरू झालेल्या आंदोलनाची तब्बल ३० तासांनी सांगता झाली. वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ ठेवून झालेल्या या आंदोलनाला गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली.

ठळक मुद्देमृतदेहासह मांडला होता ठिय्या : पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदतीसह रस्त्याच्या कामाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ट्रक आणि एसटी बसच्या धडकेत चार जणांनी जीव गमविल्यानंतर बुधवारी येथे सुरू झालेल्या आंदोलनाची तब्बल ३० तासांनी सांगता झाली. वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ ठेवून झालेल्या या आंदोलनाला गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखापर्यंत आर्थिक मदत मिळवून देण्याचे, तसेच लोहखनिजाची वाहतूक होणाऱ्या मार्गाचे रूंदीकरण तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन वनपाल अंबादे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.एटापल्ली आलापल्ली मार्गावर बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात लोहखनिज वाहतुकीसाठी जाणाऱ्या ट्रकने एसटी बसला जबर धडक दिल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. अरुंद रस्त्यावरून होणाऱ्या सदर ट्रकच्या वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात येत असल्याचे सांगत नागरिकांनी सकाळपासूनच आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. सायंकाळी या अपघातात मरण पावलेले एटापल्लीचे वनपाल प्रकाश अंबादे त्यांचा मृतदेह वनतपासणी नाक्याजवळ आंदोलनस्थळी ठेवण्यात आला. मृताच्या परिवाराला ५० लाखांची मदत, परिवारातील सदस्याला सुरजागड प्रकल्पात नोकरी, लोहखनिज वाहतुकीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि तोपर्यंत वाहतूक बंद अशा अनेक मागण्या लावून धरत आंदोलकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले.गुरूवारी सकाळी माजी आमदार दीपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंडपात येऊन अंबादे कुंटुबियांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामसभेचे प्रमुख तथा जि.प.सदस्य सैनू गोटा, सारिका प्रवीण आईलवार आणि अनेक राजकीय पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सकाळी १० वाजतानंतर मंडपात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल व उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यत पालकमंत्री व जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यत मृतदेह उचलण्यात येणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.दुपारी १२ वाजतानंतर धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम दाखल झाले. त्यानंतर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हाधिकारी शेखर सिंग तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी अंबादे कुटुंबांचे सांत्वत केले. यावेळी थोडा वेळ पालकमंत्र्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दीपक आत्राम यांनी मृत परिवाराच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढत मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविली. त्यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले. त्यानंंतर दुपारी २ वाजता अंबादे यांचा मृतदेह हलविण्यात आला. पालकमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन अपघातात जखमींची विचारपूस केली. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते, एटापल्ली येथील युवक, व्यापारी व नागरिकांनी बुधवारी रात्री जागरण करु न आंदोलन यशस्वी केले. अहेरीचे एसडीपीओ बजरंग देसाई व तसेच हेडरीचे एसडीपीओंच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.महामंडळ व लॉयड्सकडून २० लाखांची मदतयावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाकडून मृतांच्या परिवाराला १० लाख तर लॉयड्स मेटल्स कंपनीकडून १० लाख अशी २० लाखांची मदत तत्काळ देण्यात येईल असे सांगितले. या मदतीत वाढ करून अधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय अनुकंपा तत्वावर मृत कुटुंबातील नातेवाईकाला नोकरी देण्यात येईल असे सांगितले. आलापल्ली-एटापल्ली या रस्त्याचे काम मंजूर असून हे काम ८ दिवसांत सुरू करू, तोपर्यंत सुरजागडमधील लोहवाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. अपघातामधील जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च एस.टी. महामंडळ करणार आहे.धर्मरावबाबांनी मांडला ठिय्यामाजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सकाळी अहेरीवरून एटापल्लीतील आंदोलनस्थळी येण्यास निघाले असताना त्यांना येलचिल येथील उपपोलीस ठाण्याच्या पोलिसांनी थांबवून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी काही वेळ पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडून ही दडपशाही असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला.