शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
4
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
5
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
6
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
7
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
8
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
9
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
10
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
11
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
12
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
13
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
14
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
15
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
16
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
17
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
18
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

अखेर चोप येथे रोहयो काम सुरू

By admin | Published: June 21, 2016 1:07 AM

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चोप येथे सर्वे क्रमांक ९७८ येथे बोडी खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले

तहसीलदार पोलीस संरक्षणात पोहोचले : अतिक्रमणधारक शेतकऱ्याने विरोध दर्शवून बोडी खोलीकरणाचे थांबविले होते कामकोरेगाव/चोप : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चोप येथे सर्वे क्रमांक ९७८ येथे बोडी खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी अतिक्रमण केलेले शेतकरी रूपराम उरकुडा लांजेवार यांनी या बोडी कामास विरोध करून अडथळा निर्माण केला. त्यामुळे मजूर घरी परतले. दरम्यान सोमवारी देसाईगंजचे तहसीलदार अजय चरडे हे पोलीस संरक्षणात कामाच्या ठिकाणी पोहोचले. संबंधित अतिक्रमणधारक शेतकऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करून सदर बोडी खोलीकरणाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले. रूपराम लांजेवार यांनी सर्वे नंबर ९७७, ९७८ मधील बोडीच्या जागेत अतिक्रमण करून शेती कसण्यासाठी जागा ताब्यात घेतली होती. दोन महिन्यापूर्वी मजुरांनी सदर काम सुरू केले. मात्र शेतकरी लांजेवार यांनी मजूर व संबंधित यंत्रणेस काम करण्यास मज्जाव केला. त्यानंतर संबंधित यंत्रणेने बोडीच्या जागेची मोजणी केली. यात संबंधित शेतकऱ्यांची ७५ टक्के शेती ही अतिक्रमणात असल्याचे निदर्शनास आले. काम सुरू होण्याच्या वेळी नायब तहसीलदार सोनवाणे, पीएसआय सोनेकर व ३४५ रोहयो मजूर हजर होते. (वार्ताहर)अतिक्रमणधारक शेतकऱ्याला सिंचन विहिरीचा लाभ४सदर बोडीच्या जागेत अतिक्रमण करून शेती काढणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांनी याच जागेवर जवाहर सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाने या अतिक्रमणधारक शेतकऱ्याला सिंचन विहिरीच्या अनुदानाचा लाभ दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी चोपच्या सरपंच लिला मुंडले, उपसरपंच कमलेश बारस्कर, ग्रा.पं. सदस्य भरत केळझरकर, गौतम लाडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जि.प. सिंचाई विभागाकडे तक्रारही केली आहे.